Abu Azmi : आषाढी वारीबाबत अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य; वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही रस्त्यावर नमाज पठन केल्यावर मात्र...

Abu Azmi on Ashadhi Wari : वारीमुळे रस्ता जाम होतो. जेव्हा हिंदूंचे सण साजरे होतात, तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही. पण नमाज पठन करताना मुसलमानांवर तक्रारी दाखल केल्या जातात असे वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.
Abu Azmi on Ashadhi Wari
Abu Azmi on Ashadhi Wari X
Published On

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आषाढी वारीच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात, तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही. पण मुसलमानांनी नमाज पठन केल्यानंतर तक्रारी दाखल केल्या जातात', असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे. 'अबू आझमींना वादग्रस्त विधानांचा शौक आहे. अशा विधानांमुळे प्रसिद्धी मिळते', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

'मशिदीबाहेर नमाज पडू शकत नाही, आज मी येत होतो. आम्ही हिंदू बांधवांच्या सोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कोणत्याही मुसलमान बांधवांनी रस्त्यावर सण साजरे केले, तर त्यावरुन तक्रार दाखल केली जाते. आता वारीमुळे रस्ता जाम होत आहे. तर एकाही मुसलमान बांधवाने तक्रार केली नाही', असे अबू आझमी म्हणाले.

Abu Azmi on Ashadhi Wari
Beed Crime : झाड तोडण्यास विरोध; व्यक्ती संतापला, आधी महिलेला शिवीगाळ, नंतर कानशिलात लगावली अन्...; बीडमध्ये खळबळ

'उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, बाहेर रस्त्यावर नमाज पठन केले, तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स देखील रद्द केले जाईल. आज सोलापूरला येत असताना मला सांगितलं, पालखी येत आहे, लवकर जाऊ नाहीतर रस्ता जाम होईल. वारीमुळे रस्ता जाम होतो, पण आम्ही कधी त्याला मनाई केली नाही. जाणून-बुजून मुसलमानांसाठी जमीन दिली जात नाही' असे वक्तव्य अबू आझमींना पंढरपूर वारीबद्दल केले.

Abu Azmi on Ashadhi Wari
Air India च्या विमानात चढण्यासाठी पठ्ठ्या चक्क मुंबई विमानतळाच्या रनवेवर धावला, नंतर जे घडलं त्यानं...

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी सध्या पुण्याच्या दिशेने पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आषाढी वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वादंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Abu Azmi on Ashadhi Wari
Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे राहत्या घरी निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com