Ind Vs Eng : ४४७ धावांपासून नजर लागली, एक-एकजण तंबूत परतला, अवघ्या २४ धावांमध्ये अर्धा संघ गारद

Ind Vs Eng 1st Test : इंग्लंडच्या लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघाने ४७१ धावा केल्या आहेत.
Ind Vs Eng
Ind Vs EngX
Published On

Ind Vs Eng Test : भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील दुसरा दिवस सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकत भारताला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. त्यानंतर लीड्सच्या मैदानावर भारताचा संघ फलंदाजी करण्यासाठी उतरला.

सलामीसाठी आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने चांगली सुरुवात करवून दिली. केएल राहुल ४२ धावांवर बाद झाला, तर यशस्वी जैस्वालने १०१ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि रिषभ पंत यांनी खेळ सावरला. कर्णधार गिलने १४७ धावा, तर उपकर्णधार पंतने १३४ धावा केल्या.

Ind Vs Eng
Rishabh Pant : रिषभ पंतचा जलवा! बेन स्टोक्सच्या नाकावर टिच्चून झळकावले शतक; टीम इंडिया चारशे पार

शुभमन गिल बाद झाल्यानंतर करुन नायर शून्यावर बाद झाला. तेव्हा ४४७ धावा आणि ५ विकेट्स अशी भारताची स्थिती होती. ४५३ धावांवर असताना पंतची विकेट पडली. त्यानंतर लगेच ४५४ धावा असताना शार्दुल ठाकूर बाद झाला. ४५८ धावसंख्येवर जसप्रीत बुमराह, ४६९ धावसंख्येवर जडेजा बाद होऊन माघारी परतले. शेवटची प्रसिद्ध कृष्णाची विकेट ४७१ धावंसख्या असताना पडली. भारताचा डाव ४७१ धावांवर संपला.

Ind vs eng
Ind vs engX

४४७ धावांपासून एक-एक करत भारताचे खेळाडू बाद होऊ लागले. अवघ्या २५ धावांमध्ये पुढे सहा विकेट्स गेल्या. भारताने प्रथम करताना ४७१ धावा केल्या. शेवटी सलग विकेट्स पडत गेल्या असल्या तरीही भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, कारण यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रिषभ पंत अशा तीन फलंदाजांनी शतकीय कामगिरी केली.

Ind Vs Eng
Ind Vs Eng 1st Test : आयपीएलमध्ये हिरो इंग्लंडमध्ये झिरो! मेरीटवर टीम इंडियात आले, पण पहिल्याच सामन्यात फेल झाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com