Hardik Pandya IND Vs PAK Asia Cup 2025 x
Sports

IND vs PAK : फक्त २ विकेट्स अन् हार्दिकचं खास शतक होणार पूर्ण, Asia Cup Final मध्ये पंड्या कोणता विक्रम रचणार?

IND Vs PAK Asia Cup 2025 : दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान हा आशिया कप २०२५ मधील अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यामध्ये टीम हार्दिक पंड्याला विक्रम रचण्याची संधी आहे.

Yash Shirke

  • हार्दिक पंड्याला टी-२०मध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे.

  • सध्या फक्त अर्शदीप सिंहकडे टी-२०मध्ये १०० विकेट्स आहेत.

  • भारत-पाकिस्तान सामन्यात हार्दिकचा विक्रम पाहण्यास सर्वांचे लक्ष लागले आहे.

Asia Cup 2025 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा अंतिम सामना अवघ्या काही तासांमध्ये सुरु होणार आहे. या सामन्यामध्ये हार्दिक पंड्या एक अनोखं शतक झळकवण्याची सुवर्णसंधी आहे. हार्दिक पंड्याने आशिया कप २०२५ मध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एकूण ९८ विकेट्सची नोंद आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये जर हार्दिक पंड्याने दोन विकेट्स घेतल्या, तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेणारा हार्दिक दुसरा भारतीय गोलंदाज बनेल. सध्या फक्त एकाच भारतीय खेळाडूच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. तो गोलंदाज म्हणजे अर्शदीप सिंह. त्याने २०२२ पासून ६५ सामन्यांमध्ये १८.७६ च्या सरासरीने १०१ विकेट्स घेतल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रशीद खान अव्वल स्थानावर आहेत. त्याने १०३ सामन्यांमध्ये १३.९३ च्या सरासरीने १७३ विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक पंड्याने २०१६ पासून भारतासाठी १२० टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २६.५८ च्या सरासरीने ९८ विकेट्स घेतल्या आहेत.

आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर टीम इंडियाने पाकिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला. त्यानंतर सुपर ४ मध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. या सामन्यातही भारताचा विजय झाला. आता आज (२८ सप्टेंबर) दोन्ही देश पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येणार आहेत. टी-२० फॉरमॅट आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदाच अंतिम सामना खेळला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

Maharashtra Politics: निवडणुका जाहीर होताच शरद पवार गटाला भाजपचा दे धक्का; बड्या महिला नेत्यानं सोडली साथ

Shocking : कबड्डी सामना सुरू होण्याच्या काही मिनिटं आधीच प्रसिद्ध कबड्डीपटूला घातल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण; दिग्वजीय पाटील यांची जवळपास 9 तास चौकशी

SCROLL FOR NEXT