ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांसाठी मेहंदी हा एक बेस्ट पर्याय मानला जातो. पण प्रत्येक गोष्टी प्रमाणे याचेही काही नुकसान असू शकतात.
जर मेहंदीचा वापर योग्य प्रकारे केला नाही तर ती तुमच्या केसांना नुकसान पोहोचवू शकते. मेहंदी लावल्याने काय नुकसान होतात ते जाणून घ्या .
मेहंदीमधील टॅनिन केसांमधील ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे केस कोरडे होतात आणि केस तुटतात.
मेहंदी केस आणि स्कॅल्प वरील नैसर्गिक तेल काढून टाकू शकते. ज्यामुळे केस रखरखीत आणि कुरळे दिसू लागतील.
काही लोकांना मेहंदी लावल्यानंतर केसांत खाज, जळजळ आणि लालसरपणा जाणवू लागतो.
केसांवर सतत मेहंदी लावल्यामुळे केसांचा रंग जास्त गडद होऊ शकतो, जो काढणे खूप कठीण आहे.
मेहंदीमुळे येणारा कोरडेपणा केसांच्या टोकांना कमजोर करतो, त्यामुळे स्प्लिट एंड्सची समस्या वाढू शकते.
मेहंदी योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात वापरल्यास फायदेशीर ठरू शकते, पण तिचा अतिवापर केसांच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतो.