ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उचकी येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, पण लगातार उचकी येत असेल तर, तीला थांबवण्यासाठी हे सोपे उपाय करुन बघा.
उचकी थांबवण्यासाठी हळूहळू १ ते २ घोट थांबून थंड पाणी प्या.
उचकी थांबविण्यासाठी, दीर्घ श्वास घ्या, नंतर श्वास १० ते १५ सेकंदांसाठी रोखून ठेवा. असे २ ते ३ वेळा करावे.
एक चमचा साखर किंवा मध तोंडात ठेवा आणि गिळा, यामुळे उचकी थांबण्यास मदत होईल.
उचकी थांबविण्यासाठी, लिंबू खूप फायदेशीर मानला जातो. लिंबू अर्धा कापा आणि चुखा.
उचकी थांबवण्यासाठी, तुमचे गुडघे छाती जवळ लावून बसा. यामुळे तुमचा डायाफ्राम आरामशीर होतो आणि उचकी थांबते.
जर तुमची उचकी ४८ तासांपेक्षा जास्त काळ राहिली किंवा छातीत जास्त दुखू लागले तर, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्या.