ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात गरमीमुळे फक्त घामच येतो असे नाहीतर, आरोग्यासाठी देखील गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
अशा परिस्थितीत, तुमच्या आहारात थोडासाही अडथळा आजार निर्माण करू शकतो.
पण तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्यात काही गोष्टी खाल्याने आजार दूर पळू शकतात.
उन्हाळ्यात दररोज ताक, दही आणि लस्सी प्या, यामुळे पोट थंड राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात काकडी, टोमॅटो आणि कांदा जास्त खा. यातील पाण्याचे प्रमाण शरीराला थंड ठेवते.
भात यासारखे हलके अन्न आणि दुधी, भोपळा, पालक यांसारख्या हिरव्या भाज्या खा.
तेलकट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ पचायला जड असतात, म्हणून ते खाणे टाळा.