BCCI चा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या निवड समितीत बदल, दोन दिग्गज क्रिकेटपटूंची एन्ट्री

BCCI Team India Selection Committee : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय आर पी सिंह आणि प्रज्ञान ओझा या दोघांना निवड समितीत स्थान मिळाले आहे.
BCCI Team India Selection Committee
BCCI Team India Selection Committeex
Published On
Summary
  • बीसीसीआयने निवड समितीत आर पी सिंह आणि प्रज्ञान ओझा यांना सामील केले आहे.

  • मिथुन मन्हास यांची बीसीसीआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

  • महिला आणि ज्युनियर निवड समित्यांमध्येही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या.

BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम) अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मिथुन मन्हास यांची बीसीसीआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याशिवाय अन्य पदाधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली. या बैठकीत माजी क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंह यांना भारतीय पुरुष संघाच्या निवड समितीत सामील करण्यात आले.

बीसीसीआयच्या बैठकीत दिल्लीच्या अमिता शर्मा यांची महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आङे. निवड समितीमध्ये मुंबईच्या सुलक्षणा नाईक आणि हैदराबादच्या श्रावंती नायडू यांच्यासह श्यामा डे आणि जया शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. एस. शरथ यांची ज्युनियर क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

BCCI Team India Selection Committee
Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

BCCI च्या पुरुष राष्ट्रीय संघ निवड समितीचे सदस्य

  • अजित आगरकर (अध्यक्ष)

  • शिव सुंदर दास

  • अजय रात्रा

  • आर पी सिंह

  • प्रज्ञान ओझा

BCCI Team India Selection Committee
Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

आर पी सिंह

आर पी सिंहने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने १४ कसोटी सामन्यांत ४० विकेट्स, ५८ एकदिवसीय सामन्यात ६९ विकेट्स आणि १० टी-२० सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या आहेत. तो २००७ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. २०११ मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

BCCI Team India Selection Committee
Death : क्रीडा विश्वावर शोककळा; स्टार खेळाडूचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन, मॅचदरम्यान झाली होती दुखापत

प्रज्ञान ओझा

आर पी सिंह प्रमाणे प्रज्ञान ओझा देखील भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये सहभागी झाला आहे. २००८ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०१३ मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. प्रज्ञान ओझाने २४ कसोटी सामन्यात ११३ विकेट्स, १८ एकदिवसीय सामन्यात २१ विकेट्स आणि ६ टी-२० सामन्यात १० विकेट्स घेतल्या होत्या.

BCCI Team India Selection Committee
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com