Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Pakistan Boycott : आशिया कप २०२५ चा अंतिम सामन्यापूर्वी जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरु होणार आहे. पाकिस्तानच्या संघाने पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपवर पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे.
Asia Cup 2025 Final
Asia Cup 2025 Finalx
Published On

Asia Cup 2025 भोवतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी शनिवारी (२७ सप्टेंबर) जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणार आहे. पाकिस्तानने या स्पर्धेवर पूर्णपणे बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीत होणाऱ्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती म्हणजेच एनसीपीसीने गुरुवारी (२५ सप्टेंबर रोजी) एक निवेदन जारी केले आहे. या अधिकृत निवेदनामध्ये 'पाकिस्तान सरकारच्या सल्ल्यानुसार एनसीपीसीने जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे', असे नमूद करण्यात आले आहे.

Asia Cup 2025 Final
Death : क्रीडा विश्वावर शोककळा; स्टार खेळाडूचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन, मॅचदरम्यान झाली होती दुखापत

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सुरुवातीला हैदर अलीला एफ३७ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाठवण्याची योजना आखत होता. पण सुरक्षेच्या कारणास्तव आणि जनतेच्या रोषामुळे समितीने स्पर्धेतून माघार घेतली असे एनसीपीएसचे सरचिटणीस इम्रान जमील शमी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने चॅम्पियनशिपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असेही इम्रान यांनी सांगितले. हैदर अलीने २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये त्याने डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदकही जिंकले होते.

Asia Cup 2025 Final
Team India ला धक्का! स्टार खेळाडूला दुखापत, चालताही येईना, व्हीलचेअरवरून मैदानाबाहेर न्याव लागलं; Video

'आम्ही आमचे खेळाडू पाठवले नाहीत कारण आम्हाला आमचे खेळाडू, प्रशिक्षक, कर्मचारी आणि व्यवस्थापकांच्या सुरक्षिततेची काळजी आहे. भारताशी असलेल्या राजकीय संबंधांमुळे आमच्या सरकारने पाकिस्तानी खेळाडूंनी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात प्रवास करु नये असा सल्ला दिला. आशिया कपमध्ये काय सुरु आहे ते सर्वजण पाहत आहोत,' असेही इम्रान जमील शमी यांनी म्हटले.

Asia Cup 2025 Final
पाकिस्तानच्या 'वाढीव' बॉलरची अर्शदीप सिंगनं मैदानातच काढली लायकी; व्हिडिओ होतोय व्हायरल, Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com