Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला 'छावा' चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. 'छावा' नंतर विकीला महाराष्ट्रातून भरपूर प्रेम मिळाले. या चित्रपटात विकीसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील झळकली.
'छावा'साठी विकी कौशलला खूप अनेक पुरस्कार मिळाले. 'छावा'मध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचे आजही खूप कौतुक होत आहे. 'छावा' जगभरात गाजला.
विकी कौशलला नुकताच 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर – अभिनेता' हा पुरस्कार मिळाला. 'छावा' चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला. 'छावा' लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपट आहे.
पुरस्कार स्वीकारल्यावर विकी कौशलने आपल्याला मराठीत काम करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली. आवडत्या दिग्दर्शकाचे नाव देखील घेतले.
विकी म्हणाला, "ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो तो खरा महाराष्ट्रीयन..."
विकी कौशल दिग्दर्शकाचे नाव घेत म्हणाला की, "मला मराठी चित्रपट खूप आवडतात. मला दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अविनाश अरुण यांच्यासोबत काम करायला आवडेल."
"नमस्कार! तुम्ही म्हणालात मी महाराष्ट्रीय नाही. पण माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्रच आहे. माझ्यासाठी हा फक्त पुरस्कार नाही तर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या लोकांचा आशीर्वाद आहे. "
विकी कौशल संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'लव्ह अँड वॉर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'लव्ह अँड वॉर' चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटात विकीसोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील झळकणार आहे.