Rashmika-Vijay Reception Photo : लाल भरजरी साडी अन् पांढरा शुभ्र धोती-कुर्ता; रश्मिका-विजयचा रॉयल लूक पाहून चाहत्यांना याडं लागलं

Shreya Maskar

रश्मिका-विजय रिसेप्शन

साऊथचे पावर कपल रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचे काल (4 मार्च 2026) ला हैदराबादमध्ये थाटामाटात रिसेप्शन पार पडले. VIROSH च्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

Rashmika-Vijay | instagram

VIROSH लूक

रश्मिका-विजयने रिसेप्शनला पारंपरिक लूक केला होता. त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच दोघांच्या केमिस्ट्रीची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे.

Rashmika-Vijay | instagram

रश्मिकाचे सौंदर्य

रश्मिकाने रिसेप्शनसाठी लाल रंगाची गोल्डन काठ असलेली साडी नेसली होती. ज्यावर सुंदर वर्क पाहायला मिळाले. गोल्डन ज्वेलरी, केसांची वेणी, ग्लॉसी मेकअप, कपाळावर बिंदी आणि कुंकू लावून तिने हा लूक पूर्ण केला होता.

Rashmika-Vijay | instagram

हँडसम विजय

विजयने साऊथ स्टाइल पांढरा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. खांद्यावर अंगवस्त्रम घेतले होते. विजय रिसेप्शन लूकमध्ये खूपच हँडसम दिसत होता. दोघांचा हा साऊथ लूक सध्या खूपच चर्चेत आहे.

Rashmika-Vijay | instagram

फॅमिली फोटो

रश्मिका आणि विजय आपल्या कुटुंबासोबत खूप धमाल, मजा-मस्ती करताना दिसले. सर्वांनी सुंदर फॅमिली फोटो देखील काढला. दोघांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यांच्या पोषाखही खूपच सुंदर होता.

Rashmika-Vijay | instagram

कलाकारांची मांदियाळी

रश्मिका-विजयला आशीर्वाद देण्यासाठी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आले होते. रश्मिका-विजयचे चाहते त्यांच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Rashmika-Vijay | instagram

उदयपूरमध्ये लग्न

रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांचा लग्न सोहळा कुटुंब आणि जवळचा मित्र परिवार यांच्यात थाटामाटात साजरा झाला.

Rashmika-Vijay | instagram

साखरपुडा

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने तेलुगू हिंदू आण कोडावा अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केले. रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला.

Rashmika-Vijay | instagram

NEXT : शाहरुख खानने खरेदी केला होता 18 कोटींमध्ये मन्नत बंगला, आजची किंमत वाचून डोळे विस्फारतील

Shah Rukh Khan | instagram
येथे क्लिक करा...