LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Confidence Petroleum LPG ships stuck in Strait of Hormuz : मध्यपूर्वेतील युद्धामुळे नागपूरस्थित कॉन्फिडन्स पेट्रोलियम कंपनीची ११,२०० मेट्रिक टन एलपीजी असलेली दोन जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकली आहेत.
LPG ships stuck in Strait of Hormuz
LPG ships stuck in Strait of HormuzSaam TV Marathi
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Confidence Petroleum LPG ships, Strait of Hormuz gas crisis : एस. जयशंकर आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर एकीकडे भारताला मोठा दिलासा मिळाला, पण दुसरीकडे नागपूरच्या एका बड्या कंपनीला मात्र फटका बसला आहे. त्यामुळे देशासह शेजारील राष्ट्रांमध्ये LPG चा तुटवडा निर्माण झालाय. नागपूरच्या 'कॉन्फिडन्स पेट्रोलियम' कंपनीची ११ हजार २०० मेट्रिक टन गॅस असलेली २ जहाजे गेल्या १५ दिवसांपासून 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'त अडकली आहेत. याचा परिणाम श्रीलंका आणि बांगलादेशला होणाऱ्या निर्यातीवरही झालाय. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने कंपनीला आता सर्व साठा भारतातच उतरवण्याचे आणि निर्यात थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपूरच्या कंपनीची ११,२०० मेट्रिक टन एलपीजी असलेली २ जहाजे 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'त अडकली आहेत. युद्धामुळे नागपूरस्थित 'कॉन्फिडन्स पेट्रोलियम' या कंपनीने भाड्याने घेतलेली आणि ११,२०० मेट्रिक टनहून अधिक LPG वाहून नेणारी दोन जहाजे गेल्या १५ दिवसांपासून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकली आहेत. या व्यत्ययाचा फटका केवळ देशांतर्गत एलपीजी पुरवठ्यालाच नाही, तर श्रीलंका आणि बांगलादेशसह शेजारील देशांतील ग्राहकांनाही बसत आहे.

LPG ships stuck in Strait of Hormuz
LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट

कॉन्फिडन्स पेट्रोलियम दरमहा ४०,००० मेट्रिक टनहून अधिक एलपीजी आयात करते, जो घरगुती वापरासाठी आणि ऑटो-एलपीजी क्षेत्रात पुरवला जातो. व्याप्तीचा विचार करता ही भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी एलपीजी कंपनी असल्याचा दावा केला जातो. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासोबतच, ही कंपनी भारतीय बंदरांवर माल उतरवल्यानंतर शेजारील देशांनाही गॅस निर्यात करते.

LPG ships stuck in Strait of Hormuz
जयशंकर यांचा एक फोन अन् भारताचं गॅसचं टेन्शन मिटलं; इराणने घेतला सर्वात मोठा निर्णय

११,००० मेट्रिक टनहून अधिक एलपीजी वाहून नेणारे एक जहाज रत्नागिरीतील जयगड बंदरात पोहोचले आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाने कंपनीला हा सर्व साठा भारतातच उतरवण्याचे आणि निर्यात थांबवण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. कंपनी दरमहा सुमारे १४ लाख एलपीजी सिलेंडर भरते. ही जहाजे भारताकडे कधी रवाना होणार? याकडे आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

LPG ships stuck in Strait of Hormuz
Rent Agreement : नवा कायदा, डिपॉझिट जास्त घेततल्यावर घर मालकावर कारवाई होणार, वाचा नेमकं सत्य काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com