Deep Amavasya  Canva
धार्मिक

Deep Amavasya 2024: आषाढी अमावस्येला दीप पूजन करण्याचा योग्य विधी आणि महत्व; अडचणींचा डोंगर संपेल

Ashadh Amavashya 2024: तुमच्या आयुष्यतील आर्थिक चणचण सुधारण्यासाठी आणि कामामधील अढथळे दूर करण्यासाठी यंदाच्या दीप अवावस्येला दीप पूजन करा. यामुळे घरामधील नकारात्मकता निघून जाते. जाणून घ्या योग्य विधी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पौर्णिमा किंवा आमावस्येला हिंदूधर्मात विशेष महत्त्व दिलं आहे. आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या देखील म्हटलं जाते. श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते. आषाढी अमावस्येला दीप पूजन देखील केलं जातं. आषाढी अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातील वातावरण सुद्ध आणि स्वच्छ करणं आवश्यक असते.

यावर्षी आषाढी अमावस्या ४ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. यादिवशी तुमच्या घरातील सर्व दिव्यांना पूजलं जातं. आषाढी अमावस्येला दिव्यांची पूजा केल्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढते. दीप पूजन केल्यामुळे तुमच्या घरामधील आर्थिक चणचण दूर होऊन सर्व सदस्यांमधील मतभेद दूर होण्यास मदत होईल. दीप पूजनाच्या वेळी तुमच्या मनातील सर्व त्रास दूर करून सकारात्मक विचार करा आणि तुमच्या कामांमधील अढथळे दूर करण्यासाठी तुमच्या घरामध्ये दीप पूजन केले पाहिजेल.

आषाढी अमावस्येच्या दिवशी दीप पूजन केले जाते. या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून घरातील दिव्यांची पूजा केली जाते. महाराष्ट्रामध्ये या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखलं जाते. यंदाची दीप अमावस्या ३ ऑगस्ट दुपारी ०३ वाजून ५० मिनिटांनी सुरु होईल तर ४ ऑगस्टला ४ वाजून ४२ मिनिटांनी सांपणार आहे.

दिप पूजनाचं महत्त्व:

दिवा मांगल्याचा, चैतन्याचा प्रतिक मानला जातो. तुमच्या आयुष्यात सुखं- शांती येण्यासाठी आषाढ आमावस्येला दीपपूजन केल्या लाभ होईल. धार्मिक मान्यतेनुसार, तुमच्या आयुष्यामधील अंधार दूर करण्यासाठी आषाढी अमावस्येला दीप पूजन करा.

दीप पूजन कसे करावे?

सकाळी उठल्यावर स्वच्छ स्नान करा. त्यानंतर घरातील सर्व दिवे स्वच्छ गूवा आणि स्वच्छ पूसून त्यामध्ये तेल किंवा तूप भरा. त्यानंतर एका पाटा भोवती रांगोळी काढून त्यावर दीप प्रज्वलीत करा. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी दीव्यांची पूजा करून आशिर्वाद घ्या. दीप अमावस्येला तेलाचा दिवा लावल्यामुळे घरातील शनिदोषापासून मुक्त व्हाल.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आमदार सचिन अहिर यांनी आमदार अमोल मिटकरींना दिला नवा चष्मा गिफ्ट

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT