Somvati Amavasya 2023 : आज सोमवती अमावस्या, या दिवशी चुकूनही करु नका हे काम; अन्यथा

Never Do These Work In Somvati Amavasya : आषाढी सोमवती अमावस्या ही १७ जुलै रोजी असून याला दर्श अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणूनही ओळखले जाते.
Somvati Amavasya 2023
Somvati Amavasya 2023Saam tv
Published On

Ashadh Amavasya : हिंदू धर्मात सोमवती अमावस्या ही अधिक महत्त्वाची असते. आषाढी सोमवती अमावस्या ही १७ जुलै रोजी असून याला दर्श अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणूनही ओळखले जाते.

श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी ही अमावस्या येते अनेक जण तिला गटारी अमावस्या म्हणून ओळखतात. श्रावण मास हा भगवान शंकराला अति प्रिय. या दिवसांत शंकराची मनोभावे भक्ती केल्यास त्याची कृपा आपल्यावर सदैव राहाते. पंरतु, आज अमावस्या असल्यामुळे आपण काही गोष्टी या टाळायला हव्यात.

Somvati Amavasya 2023
Deep Amavasya 2023 : दीप अमावस्या कधी आहे? जाणून घ्या तिथी, महत्त्व व पूजा पद्धत

1. अमावस्या तिथी हा सूर्य आणि चंद्राच्या मिलनाचा काळ आहे. चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अमावस्येला चंद्र पूर्णपणे नाहीसा होतो, त्यामुळे कमकुवत मनाच्या व्यक्तींनी एकट्या ठिकाणी जाऊ नये

2. सोमवती अमावस्येला कोणतेही झाड चुकूनही तोडू नका. कारण पितृदोष (Pitrudosh) निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. जीवनात धन व अन्नाची कमतरता येते.

Somvati Amavasya 2023
Shiv Temple : ठाणे जिल्ह्यातील ९५० वर्षांपूर्वी बांधलेल्या शिवमंदिराचे रहस्य माहिती आहे का?

3. या अमावस्येला नखे व केस कापू नयेत. तसेच केसही (Hair) धुवू नये असे सांगितले जाते. यामुळे घरात गरीबी येते. आर्थिक संकंटाना सामोरे जावे लागते.

4. अमावस्येच्या दिवशी कोणत्याही महिलांनी (Women) सौंदर्य प्रसाधने खरेदी करू नयेत. हा दिवस पूर्वजांचे स्मरण करण्याचा दिवस असतो. या अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी शिवपूजनासह श्राद्ध कर्म करावे.

5. सोमवती अमावस्येला कोणत्याही प्रकारची नशा करू नका, तामसिक भोजन टाळावे. असे केल्यास भविष्यात त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com