Hanuman Jayanti: आर्थिक चणचण, संकटातून मुक्ती हवी? या हनुमान जयंतीला करा 'हे' उपाय

Hanuman Jayanti:हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात तसेच आर्थिक समस्यांपासूनही मुक्ती मिळते. हनुमान जयंतीच्या दिवशी काही उपाय करून तुम्ही जीवनातील समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
Hanuman Jayant
Hanuman Jayantgoogle

Hanuman Jayanti: हिंदू धर्मात दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. हनुमानजींचा जन्म याच दिवशी झाला होता, असं म्हटलं जातं. यावर्षी हनुमान जयंती २३ एप्रिल रोजी साजरी होणार आहे. धार्मिक मान्यतांनुसार हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच आर्थिक चणचणदेखील दूर होत असते. यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी काही उपाय केली पाहिजेत. हे काय उपाय आहेत हे आपण जाणून घेऊ..

मेहनत करूनही चांगली कमाई होत नसेल किंवा पैसा हाती राहत नसेल, घरात समृद्धी नसेल तर पुढील उपाय तुम्ही करू शकतात. हनुमान जयंतीच्या दिवशी विधीनुसार बजरंगबलीची पूजा करावी आणि ११ वेळा हनुमान चिलासाचा पाठ करा. हे उपाय सतत ११ दिवस केले तर तुम्हाला फायदे दिसतील.

कुंडलीत काही दोष असतील तर हे उपाय करून पाहू शकता. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन उडीद, शेंदूर, चमेलीचे तेल आणि फुले, उडिदाचे ११ दाणे बजरंगबलीला अर्पण करा. यानंतर भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठण करावे.

जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही हनुमान जयंतीला बजरंगबलीसमोर तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा टाका. यानंतर भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठण करावे. यामुळे निरोगी शरीराचा आशीर्वाद मिळत असतो. जीवनातील कोणत्याही प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी "ओम रामदूताय नमः" मंत्राचा १०८ वेळा जप करा. हा मंत्र जाप केल्याने हनुमानजीं आपल्या संकटातून दूर भेटायला लावलं असतं.

Hanuman Jayant
Ram Navami 2024 Wishes: राम जन्मला ग सखी.., राम नवमीनिमित्त राम भक्तांना पाठवा शुभेच्छा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com