Shruti Vilas Kadam
जेवल्यानंतर लगेच झोपल्यास अन्न नीट पचत नाही. त्यामुळे कॅलरी जास्त साठतात आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.
जेवणानंतर लगेच गोड पदार्थ खाल्ल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होतात. यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.
जेवणानंतर थंड पेये पिल्यास पचनक्रिया मंदावते. तसेच सॉफ्ट ड्रिंकमध्ये साखर जास्त असल्याने वजन वाढू शकते.
जेवणानंतर लगेच बसून मोबाइल किंवा टीव्ही पाहिल्यास शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे कॅलरी बर्न होत नाहीत आणि वजन वाढते.
जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिल्यास पचनावर परिणाम होतो. त्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.
जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्यास पचन प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे गॅस आणि अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते.
जेवणानंतर थोडं चालणं आरोग्यासाठी चांगलं असतं. पण जर अजिबात चाललो नाही तर पचन मंदावते आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो.