Shruti Vilas Kadam
बेसन, दूध आणि हळद यांचा फेस पॅक त्वचेला नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करतो. नियमित वापर केल्यास त्वचा ताजी आणि उजळ दिसते.
उन्हामुळे झालेलं टॅनिंग कमी करण्यासाठी हा फेस पॅक उपयुक्त ठरतो. हळद आणि बेसन त्वचेतील काळेपणा कमी करण्यास मदत करतात.
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचेवरील पिंपल्स आणि डाग कमी होण्यास मदत होते.
बेसन त्वचेतील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ राहते.
हा फेस पॅक त्वचेवरील मृत पेशी (डेड स्किन) दूर करण्यास मदत करतो. त्यामुळे त्वचा अधिक फ्रेश आणि चमकदार दिसते.
एका बाऊलमध्ये 2 चमचे बेसन, 1 चमचा दूध आणि चिमूटभर हळद घ्या. हे सर्व साहित्य एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा.
तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10–15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने धुवा. आठवड्यातून 2–3 वेळा वापरल्यास चांगला परिणाम दिसतो.