Shreya Maskar
आषाढ महिना सुरु होताच सणासुदीला सुरुवात होते.
सणासुदी म्हटलं की चमचमीत पदार्थ आले, चला तर मग बनवूया तिखट मिठाच्या खुसखुशीत पुऱ्या.
तिखट मिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, कसूरी मेथी, बेसन, तेल, ओवा, तीळ, तिखट मसाला, मीठ, हळद, धणे-जिरे पूड, पिठीसाखर इत्यादी साहित्य लागते.
तिखट मिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ, बेसन, तिखट, हळद, धणे-जिरे पूड, तीळ, ओवा, मीठ, पिठीसाखर हे सगळे एकत्र करून घ्या.
आता यामध्ये गरम तेलाचे मोहन घालून कोमट पाण्यात पीठ घट्टसर मळून घ्या.
तुमच्या आवडीनुसार यामध्ये कसूरी मेथी घाला.
एकसारख्या पातळ पुऱ्या लाटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून मंद आचेवर पुऱ्या खरपूस तळून घ्या.
तळताना पुरी सतत झाऱ्याने दाबत रहा, त्यामुळे पुरी कडक होण्यास मदत होते.
पावसाळ्यात गरमागरम चहासोबत चमचमीत तिखट मिठाच्या पुऱ्यांचा आस्वाद घ्या.