Shreya Maskar
पावसात झटपट ब्रेड चा वापर न करता हाय प्रोटीनयुक्त सँडविच बनवा.
प्रोटीन युक्त सँडविच बनवण्यासाठी मूग डाळ, पाणी, मीठ, कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, चीज स्लाइस इत्यादी साहित्य लागते.
नो ब्रेड सँडविच तयार करण्यासाठी सर्वप्रथम मूगडाळ स्वच्छ धुवून रात्री पाण्यात भिजवून ठेवा.
सकाळी मूग डाळ मिक्सरला लावून छान पेस्ट करून घ्या. परंतु त्यामध्ये पाण्याचा वापर टाळा.
मिक्सरला मूग डाळ लावताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घालावे.
कांदा , टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिरची, बीट आणि तुमच्या आवडीच्या इतर भाज्या कापून घ्या.
आता एका भांड्यात सर्व भाज्या, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, ऑरिगॅनो टाकून सगळ मिश्रण एकत्र करून घ्या.
तुमच्याकडे सँडविच बनवण्याचे भांडे असल्यास त्याचा वापर करा किंवा एका पॅनवर ब्रशच्या साहाय्याने छान बटर लावून घ्या.
मंद आचेवर गॅस ठेवून मूग डाळीचे मिश्रण पसरवा आणि त्यावर भाज्यांचे सारण ठेवून चीज स्लाइस ठेवा.
या सँडविचला पुन्हा एकदा बटर लावून दोन्ही बाजूने सँडविच खरपूस भाजून घ्या.
पुदिन्याच्या चटणीसोबत प्रोटीन युक्त सँडविच चा आस्वाद घ्या.