ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, पांढरे तीळ, नाचणीचं पीठ, गुळ, खजुरची पेस्ट, वेलची पावडर.
सर्वप्रथम कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये भोपळ्याच्या बिया भाजून घ्या. त्यामध्ये अर्धा कप अळशीच्या बिया ताकून व्यवस्थित भाजून घ्या.
त्यानंतर त्यान सूर्यफुलाच्या बिया, अर्धा कप पांढरे तीळ टाकून व्यवस्थित सोनेरी रंग होईपर्यंत भाजा. भाजून घेतलेल्या बिया थंड होण्यासाठी ठेवा.
बिया थंड झाल्यानंतर मिस्करच्या भांड्यातून जाडसर वाटून घ्या. कढईमध्ये पुन्हा तूप गरम होण्यासाठी ठेवा. त्यामध्ये अर्धा वाटी गूळ टाकून ते वितळवून घ्या.
त्यामध्ये दोन चमचे खजुराची पेस्ट घाला. त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकून मिक्स करून झाल्यानंतर बियांचे मिश्रण आणि नाचणीचे पीठ टाका.
हाताला तूप लावून गरम मिश्रणाचे लाडू वळून घ्या आणि थोड्यावेळ एका ताटामध्ये ठेवा.
तुमचे हेल्दी आणि पौष्टीक बियांचे लाडू तयार आहेत. दररोज या बियांचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहिल.