Chetan Vadnere Wedding: 'ठिपक्यांची रांगोळी' फेम शशांकने रिअल लाइफ अप्पूसोबत बांधली लग्नगाठ; शेअर केले खास फोटोज

"Thipkyanchi Rangoli" Fame Chetan Vadnere And Rujuta Dharap Wedding Photos: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फे अभिनेता चेतन वडनेरेने अभिनेत्री आणि गर्लफ्रेंड ऋतुजा धारपसोबत आज (२२ एप्रिल २०२४) लग्नगाठ बांधली आहे.
"Thipkyanchi Rangoli" Fame Shahank AKA Chetan Vadnere And Rujuta Dharap's Wedding photos
"Thipkyanchi Rangoli" Fame Shahank AKA Chetan Vadnere And Rujuta Dharap's Wedding photosInstagram

"Thipkyanchi Rangoli" Fame Chetan Vadnere Wedding Photos

सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू आहे. अशातच अनेक सेलिब्रिटी मंडळीही लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. काल (रविवारी- २१ एप्रिल) अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अशातच ‘ठिपक्यांची रांगोळी’ आणि ‘फुलपाखरु’ मालिकेतून चाहत्यांमध्ये प्रकाश झोतात आलेला अभिनेता चेतन वडनेरे याने अभिनेत्री ऋतुजा धारप हिच्याशी आज (२२ एप्रिल २०२४) लग्नगाठ बांधली आहे.

"Thipkyanchi Rangoli" Fame Shahank AKA Chetan Vadnere And Rujuta Dharap's Wedding photos
Rakhi Sawant News: राखी सावंतवर अटकेची टांगती तलवार, सुप्रीम कोर्टाने चार आठवड्यात सरेंडर करण्याचे दिले आदेश

अवघ्या काही तासांपूर्वीच खुद्द अभिनेत्यानेच इन्स्टाग्रामवर काही लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.सध्या दोघांच्याही लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. लग्नामध्ये दोघांनीही पारंपारिक मराठमोळा लूक केलेला होता. लग्नामध्ये, चेतनने जांभळ्या रंगाचे धोतर नेसलेले दिसत आहे, चेतनला मॅचिंग करत नववधू ऋतुजाने आकाशी आणि निळ्या रंगाची नऊवार साडी नेसली आहे. सप्तपदीसाठी दोघांनी या खास लूकची निवड केली आहे.

तर वरमाला घालताना, ऋतुजाने पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. तर चेतनने सोनेरी रंगाची डिझाईन असलेला पांढऱ्या रंगाचा उपरणं आणि जांभळे धोतर परिधान केले आहे.

“२२.०४.२०२४ ॥ कुर्यात सदा मंगलम् ॥” असं सुंदर कॅप्शन देत चेतनने लग्नाचे फोटोज् शेअर केले आहेत. चेतन आणि ऋतुजाच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या नवविवाहित दाम्पत्याला फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऋतुजा बागवे, हृता दुर्गुळे, नम्रता प्रधान, मेघना एरंडे, तृष्णा चंद्रात्रे, अद्वैत काडणे, अक्षर कोठारी अशा अनेक सेलिब्रिटींनी दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. (Entertainment News)

"Thipkyanchi Rangoli" Fame Shahank AKA Chetan Vadnere And Rujuta Dharap's Wedding photos
Kareena Kapoor On Ram Leela Film: "दीपिका- रणवीरने 'रामलीला'साठी माझे आभार मानायला हवे..."; करीना कपूर असं का म्हणाली?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com