BMC Job Saam Tv
naukri-job-news

BMC Job : चौथी पास तरुणांनाही मुंबई महापालिकेत मिळणार नोकरी; सर्व माहिती एका क्लिकवर

BMC job Recruitment 2024: बृह्नमुंबई महापालिकेत नोकरीची संधी आहे. चौथी, सातवी आणि दहावी पास लोकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

बृह्नमुंबई महापालिकेत भरती सुरु आहे. ४ थी, ७ वी आणि १० वी उत्तीर्ण लोकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात सफाई कामगारांसाठी भरती आहे. या साठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. बृहन्मुंबई महापालिकेद्वारे वैद्यकीय आरोग्य सी विभागातर्फे याबाबत जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे.

सफाई कर्मचारी या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी कमीत कमी चौथी पास झालेले उमेदवार अर्ज करु शकतात. त्यामुळे ज्या लोकांना कामाची गरज आहे. त्यांच्यासाठी ही उत्त संधी आहे. मुंबई महानगरपालिकेत सरकारी विभागात ही नोकरी मिळवण्याची संधी आहे.

या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. या नोकरीत प्रतिदिन फक्त ३ तास काम असणार आहे. प्रति दिन तीन तास काम करण्यासाठी ५ हजार रुपयांचे मासिक वेतन मिळणार आहे. ही पदभरती कंत्राती तत्वावर करण्यात येणार आहे.

२४ जूनपासून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. तर २ जुलै ही अर्ज देण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी,७६, श्रीकांत पालेकर मार्ग, चंदनवाडी, मरीन लाइन्स, मुंबई येथे अर्ज पाठवण्यास सांगितले आहे. आपली माहिती आणि काही कागदपत्रे अर्जासोबत पाठवावी लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT