IIMC Jobs 2024 : खूशखबर! सरकारी नोकरीची संधी, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी?

IIMC Job : आयआयएमसी मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांना आयआयएमसीच्या वेबसाइटवर संपूर्ण माहिती मिळेल.
IIMC Job
IIMC Jobs 2024SAAM TV

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ही देशातील सर्वात प्रतिष्ठित मीडिया शिक्षण संस्था असून येथे सरकारी नोकऱ्यांसाठी भरती जाहीर केली गेली आहे. आयआयएमसी ने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ७ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. सहाय्यक संपादक, सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी, विभाग अधिकारी, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि ग्रंथालय लिपिक ही ७ पदे उपलब्ध आहेत.

पात्रता, आरक्षण, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहितीसाठी इच्छुक उमेदवार आयआयएमसी वेबसाइट iimc.gov.in वर जाऊन वैकेंसी विभागाला भेट द्या. ऑनलाइन अर्ज २५ जून २०२४ पासून सुरु झाले आहेत. तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०२४ आहे. अर्जाची हार्ड कॉपी १२ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपूर्वी संस्थेमध्ये जमा करावी. ऑनलाइन अर्ज iimcnt.samarth.edu.in वर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही iimc.gov.in/vacancy वर लॉग इन करू शकता.

IIMC Job
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! ७ व्या वेतन आयोगाचा थकबाकीचा ५ वा हप्ता या महिन्यात होणार जमा

गेल्या अनेक वर्षांपासून, जनसंवाद शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात IIMC प्रथम क्रमांकावर आहे. IIMC ला जानेवारी २०२४ मध्ये डीम्ड-टू-बी विद्यापीठाचा दर्जा देखील प्राप्त झाला आहे. त्यामुळेच या शैक्षणिक वर्षापासून ही संस्था पहिल्यांदा दोन पदव्युत्तर प्रोग्राम सुरू करणार आहे. UGC च्या सल्ल्यानुसार, ३१ जानेवारी रोजी शिक्षण मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, पत्रकारिता आणि जनसंवादासाठी एक अग्रगण्य संस्थेला डीम्ड विद्यापीठ घोषित केले आहे. आयआयएमसी आता विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवीसह पदवी अभ्यासक्रम सुरु होणार आहेत.

IIMC Job
Bank Recruitment : खूशखबर! सेंट्रल बँक ऑफ इंडियात मोठी भरती, ४८४ पदे; असा कराल अर्ज!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com