Pension Schemes: खासगी नोकरदारांना सरकार देणार पेन्शन, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Private Employed Pension : आता खासगी नोकरी करणाऱ्यांनाही सरकारकडून पेन्शनची सुविधा दिली जात आहे. यामुळे या क्षेत्रातील लोकांना वृद्धत्वाची चिंता करण्याची गरज नाही. सरकारने या नोकरदार वर्गासाठी नवीन योजना बनवली असून या योजनेच्या माध्यमातून खासगी क्षेत्रात काम करणारा व्यक्ती वृद्धपकाळात पेन्शन मिळवू शकतो.
Private Employed People Pension:
Private Employed People Pension:business standard

Private Employed People Pension What is Pension Scheme:

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना आपल्या निवृत्तीकाळानंतरच्या आयुष्याची चिंता नेहमी सतावत असते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर वृद्धपकाळात पैसा कसा येईल, आपले खर्च कसे होतील याची चिंता अनेकांना सतावते. नोकरदारांची ही चिंता सरकारने दूर केलीय. आता खासगी नोकरी करणाऱ्यांनाही सरकारकडून पेन्शनची सुविधा दिली जात आहे. यामुळे या क्षेत्रातील लोकांना वृद्धत्वाची चिंता करण्याची गरज नाहीये. (Latest News)

सरकारने खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी नवीन योजना बनवली असून या योजनेच्या माध्यमातून खासगी क्षेत्रात काम करणारा व्यक्ती वृद्धपकाळात पेन्शन मिळवू शकतो. या योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा याची प्रक्रिया आपण जाणून घेऊ. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेकदा खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना वृद्धापकाळासाठी कोणत्याही प्रकारचे निवृत्ती वेतन मिळत नाही. या क्षेत्रातील लोक आपले संपूर्ण आयुष्य नोकऱ्यांमध्ये घालवतात पण तरीही पेन्शनसारख्या सुविधांपासून ते वंचित राहतात. त्यामुळे वयाच्या ६० नंतर लोकांना उदरनिर्वाह करण्यास अडचणी येतात. लोकांची ही अडचण लक्षात घेऊन सरकारकडून एक योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पेन्शनची सुविधा मिळणार आहे.

सरकारच्या या योजनेचं नाव नॅशनल पेन्शन स्कीम आहे, म्हणजेच एनपीएस. यात सरकार सुद्धा योगदान देत असते. म्हणजेच काय या योजनेत तुम्ही पैसा गुंतवला तर सरकार व्याजच्या रुपात आपल्या पैशाला पैसा लावून देत असते. यामुळे या योजनेचा लाभ घेऊन आपण आपलं निवृत्तीनंतरच्या आयुष्याची योजना योग्यपणे आखू शकतो.

खाते कसे उघडणार

एनपीएसमध्ये खाते उघडण्यासाठी कोणतीच किचकट प्रक्रिया करण्याची गरज नाहीये. तुम्ही हे खाते घरी बसून सुद्धा उघडू शकतात. यासाठी फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक आहे. खाते उघडण्यासाठी पेन्शन सिस्टम ट्रस्ट या वेबसाईटवर जा. तेथे आधार कार्ड व्हेरिफिकेशनचा अर्ज भरा. त्यानंतर एनपीएस खाते हे ५०० रुपये गुंतवणून सुद्धा उघडता येते. परंतु लक्षात घ्या वयाच्या ६० व्या वर्षी हा पैसा आपल्याला काढता येतो. फंड लवकर काढायचा असेल तर टियर-२ अंतर्गत खाते उघडावे लागेल, हे एका बचत खात्याप्रमाणे असेल.

Private Employed People Pension:
PPF Account : 5 एप्रिलपूर्वी पूर्ण करा हे महत्त्वाचे काम, अन्यथा होईल लाखोंचे नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com