PPF Account : 5 एप्रिलपूर्वी पूर्ण करा हे महत्त्वाचे काम, अन्यथा होईल लाखोंचे नुकसान

PPF Investment : जर तुम्ही देखील मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी पीपीएफ खाते उघडले असेल? त्याचे फायदे काय आहेत? तुम्हीही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर ५ एप्रिल ही तारीख महत्त्वाची आहे. २०२४-२५ आर्थिक वर्ष सुरु झाले आहे.
PPF Account, PPF Investment
PPF Account, PPF InvestmentSaam Tv
Published On

PPF News :

मुलांचे वय वाढू लागले की, पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावू लागते. अनेक पालक मुलांच्या भविष्यासाठी काही सरकारी योजना, बँक किंवा पीपीएफ खात्यात गुंतवणूक करतात.

जर तुम्ही देखील मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी पीपीएफ खाते उघडले असेल? त्याचे फायदे काय आहेत? तुम्हीही पीपीएफमध्ये गुंतवणूक (Investment) करत असाल तर ५ एप्रिल ही तारीख महत्त्वाची आहे. २०२४-२५ आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला या आर्थिक वर्षासाठी आर्थिक कर (Tax) आणि नियोजन करायचे असेल तर तुमच्यासाठी वेळ खूप महत्त्वाचा आहे.

कर वाचवण्यासाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी पीपीएफकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. पीपीएफ ही एक अशी योजना (Scheme) आहे ज्यामध्ये तुम्हाला करबचतीसह चांगला व्याजदर मिळतो. पीपीएफ योजनेत ५ एप्रिल ही तारीख महत्त्वाची मानली जाते. ही तारीख चुकल्यास लाखोंचे नुकसान होऊ शकते.

PPF Account, PPF Investment
Gold Rate Hike 2024 : गुढीपाडव्यापूर्वीच सोनं ७२ हजारांवर? खरेदीसाठी मागणीत वाढ सुरुच; कारण काय?

1. 5 एप्रिल महत्त्वाचा का?

जर तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ५ एप्रिलपर्यंत पीपीएफ योजनेत एकरकमी पैसे गुंतवले तर तुम्हाला सर्वाधिक व्याजदराचा लाभ मिळेल. पीपीएफ खात्यात दर महिन्याच्या ५ तारखेला व्याज मोजले जाते. जर तुम्ही या दिवशी गुंतवणूक केल्यास तुम्हाला महिन्याभराचे व्याज मिळेल.

2. व्याजदर किती मिळेल?

पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर सरकार गुंतवणुकदारांना ७.१ टक्क्याने व्याजाचा लाभ देत आहे. जर एखाद्या व्यक्तीने प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत गुंतवणूक केली तर त्याने जमा केलेल्या रकमेवर महिन्याभराचे व्याज मिळते. जर तुम्ही ५ तारखेनंतर गुंतवणूक केली तर तुम्हाला फक्त ५ ते ३० तारेखदरम्यानचे कमी व्याजदर मिळेल. यामुळे तुम्हाला महिन्याभरात लाखोंचे नुकसान होऊ शकते.

PPF Account, PPF Investment
Today's Gold Silver Rate : सोन्याचा भाव ६०० रुपयांनी वधारला, चांदीच्या भावातही १००० रुपयांनी वाढ; जाणून घ्या आजचे दर

3. व्याजदराचे गणित समजून घ्या

पीपीएफच्या कॅल्क्युलेटरनुसार जर तुम्ही या आर्थिक वर्षात ५ एप्रिलपर्यंत एकरकमी १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली. आणि ही गुंतवणूक १५ वर्षे सुरु ठेवली तर तुम्हाला एकूण रकमेवर १८.१८ लाख रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेनंतर पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला १७.९५ लाख रुपये व्याज मिळेल. यामध्ये तुमचे १५ वर्षात २३,१८८ रुपयांचे व्याजाचे नुकसान होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com