Cyber Crime : ऑनलाइन ट्रेडिंग’च्या नावाने तरुणाची २६ लाखांत फसवणूक

Jalgaon News : १० मे ते ६ जून २०२४ या दरम्यान वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात २६ लाख ७४ हजार रुपयांची रक्कम घेतली
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

यावल (जळगाव) : सायबर क्राईम वाढले असताना सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सहज अनेकजण अडकत आहेत. अशाच प्रकारे एका तरुणाला ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावल तालुक्यातील राजोरे गावातील या तरुणाची तब्बल २६ लाख रुपयात फसवणूक झाली आहे. 

Cyber Crime
Sambhajinagar Rain : बारा दिवसात १४ जणांचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीज कोसळल्याच्या घटना

यावल (Yawal) तालुक्यातील राजोरे येथील चेतन विनायक नेहेते (वय ३६) या तरुणाला टेलिग्राम या सोशल नेटवर्कवर दीपक राज व लेझर्ड एव्हिलीन नामक आयडी असलेल्या दोघांनी संपर्क साधला. विश्वास संपादन करून ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा करून देऊ, असे तरुणाला सांगितले. त्यानुसार १० मे ते ६ जून २०२४ या दरम्यान वेळोवेळी त्यांच्याकडून (Cyber crime) ऑनलाइन स्वरूपात २६ लाख ७४ हजार रुपयांची रक्कम घेतली. ती परत न करता त्याची फसवणूक केली. 

Cyber Crime
Amravati News : कर्ज मंजुरीसाठी अपंगाचा आत्मदहनाचा प्रयत्न; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

सायबर पोलिसात तक्रार 

दरम्यान आपले पैसे पार्ट मिळत नसून फसवणूक झाली, हे निदर्शनास आल्यानंतर चेतन नेहेते याने जळगाव सायबर पोलिस (Cyber Police) ठाणे गाठले. यानंतर सोशल नेटवर्कवरील दीपक राज व लेझर्ड एव्हिलिन आयडी ओळख असलेल्या दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com