Google Update: Google चं नवीन अपडेट! ऑफलाइन किंवा स्विच ऑफ असलेल्या फोनचेही लोकेशन येणार शोधता

Google Find My Device: जगभरात लाखो लोक गुगलचा वापर करतात. गुगलच्या वापराने जगातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. नुकतेच गुगलने युजर्ससाठी एक महत्त्वाचे अपडेट केले आहे.
Google Find My Device Update
Google Find My DeviceGoogle
Published On

Google New Update On Find My Device:

जगभरात लाखो लोक गुगलचा वापर करतात. गुगलच्या वापराने जगातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. गुगलचे अनेक अॅप्सदेखील आहे. ज्याच्या मदतीने अनेक कामे सोपी होतात. गुगल नेहमी युजर्ससाठी नवनवीन फीचर लाँच करत असते. गुगलने नुकतेच Find My Device हे फीचर लाँच केले आहे.

गुगलचे हे फीचर युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या फीचरच्या मदतीने ऑफलाइन किंवा बंद केलेला फोनदेखील शोधला जाऊ शकणार आहे. गुगलने सध्या अमेरिका आणि कॅनडामध्ये हे फीचर लाँच केले आहे. लवकरच इतर देशांमध्ये हे फीचर लाँच केले जाणार आहे. (Latest News)

Find My Device हे फीचर Crowdsourced Network वर काम करत आहे. यामुळे तुमची चोरी झालेला फोन शोधण्यास मदत होते. Google चे हे फीचर Apple च्या Find My Device सारखे आहे. हे नवीन फीचर Android 9 वर काम करेल.

Find My Device हे युजर्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरु शकते. हे फीचर मोबाईल ऑफलाइन असला तरीही मोबाईल शोधण्यास मदत करेल. यामध्ये युजर्स मोबाइल ऑफलाइन रिंग तयार करण्यास सक्षम असेल. याच्या मदतील ते Google Maps वर त्याचे लोकेशन पाहू शकतात. सध्या हे फीचर फक्त मोबाईलसाठी आहे. काही काळानंतर हे फिचर इतर उत्पादनांवरदेखील उपलब्ध असेल.

Google Find My Device Update
Mahindra XUV 3XO : जबरदस्त फीचर आणि आकर्षक लूकसह महिंद्राची XUV 3XO होणार लाँच; जाणून घ्या

यापूर्वी Find My Device हे फीचर फक्त ऑनलाइन असल्यावरच वापरता येत होते. परंतु आता तुमचा फोन ऑफलाइन किंवा बंद असल्यासदेखील तुम्ही हे फीचर वापरु शकतात.

Google Find My Device Update
Petrol Diesel Rate Today: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com