Mahindra XUV 3XO : जबरदस्त फीचर आणि आकर्षक लूकसह महिंद्राची XUV 3XO होणार लाँच; जाणून घ्या

Mahindra XUV 3XO Launch Date: महिंद्रा ही देशातील नावाजलेली वाहन उत्पादन कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनी लवकरच Mahindra XUV 3XO लाँच करणार आहे.
Mahindra XUV 3XO
Mahindra XUV 3XOSaam Tv

Mahindra XUV 3XO Features And Specification:

महिंद्रा ही देशातील नावाजलेली वाहन उत्पादन कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनी लवकरच Mahindra XUV 3XO लाँच करणार आहे. Mahindra XUV 3XO हे XUV300 चे अपडेटेड व्हर्जन आहे.

XUV 3XO कार २९ एप्रिल जागतिक बाजारपेठेत पदार्पण करणार आहे. कार लाँच होण्याआधीच महिंद्रा कंपनीच्या डिलर्सनी २१,००० रुपयांच्या टोकन किंमतीवर बुकिंग सुरु केले आहे. काही निवडक डिलर्संनी हे बुकिंग सुरू केले आहे. कंपनीने या कारचा टीझर लाँच केला आहे. कंपनीची ही नवीन कार पॅनोरॅमिक सनरुफसह येणारी पहिली कार असेल. तसेच या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कारदेखील असणार आहे. (Latest News)

फीचर्स

मीडिया रिपोर्टनुसार, या कारमध्ये नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये XUV 3XO मध्ये लेव्हल 2 ADAS (Advanced Driver Assistance System) सह 360 डिग्री कॅमेरा, वेंटिलेटेड फ्रंड सीट, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल देण्यात आले आहे. याचसोबत कारमध्ये १०.२५ इंच टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिमदेखील देण्यात आली आहे. जी Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटिला सपोर्ट करेल. याशिवाय कारमध्ये 10.25 इंच पू्र्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कलस्टर देण्यात आले आहे.

Mahindra XUV 3XO
Petrol Diesel Rate Today: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील?

डिझाइन

नवीन Mahindra XUV 3Xo चे डिझाइन XUV300 पेक्षा वेगळे असेल. ही कार महिंद्रा BE इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या डिझाइनपासून प्रेरित असेल. या एसयूव्हीमध्ये नवीन डिझाइन केलेले ग्रिल, ड्युअल बॅरल एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहे. यामध्ये ड्युअल टोन अलॉय व्हील्स का नवीन सेट देण्यात आला आहे.

कंपनीने या कारच्या एक्स्टेरिअर आणि इंटेरिअर पूर्णपणे अपडेट केले आहे. नवीन महिंद्रा 3XO मध्ये 1.5 लिटर डिझेल, 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.2 लिटर डायरेक्ट इंजेक्शन टर्बो पेट्रोल इंजिनसह बाजारात लाँच होणार आहे.

Mahindra XUV 3XO
नवीन Bajaj Pulsar N250 उद्या भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com