Bajaj Pulsar N250
Bajaj Pulsar N250Saam Tv

नवीन Bajaj Pulsar N250 उद्या भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Bike News: बजाज ऑटो उद्या म्हणजेच 10 एप्रिल रोजी भारतात आपला नवीन पल्सर N250 लॉन्च करणार आहे. या नवीन बाईकमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

Bajaj Pulsar N250:

बजाज ऑटो उद्या म्हणजेच 10 एप्रिल रोजी भारतात आपला नवीन पल्सर N250 लॉन्च करणार आहे. या नवीन बाईकमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. हे सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडे वेगळे असेल आणि त्यात नवीन ग्राफिक्स आणि फीचर्सही पाहायला मिळणार आहेत.

इतकेच नाही तर यांच्या इंजिनमध्येही बदल पाहायला मिळू शकतो. ही बाईक अशा ग्राहकांना आकर्षित करेल ज्यांना स्पोर्टी आणि पॉवरफुल बाईक्स चालवायला आवडतात. बजाजची पल्सर सीरीज भारतात खूप लोकप्रिय आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bajaj Pulsar N250
Tata Punch EV वर पहिल्यांदा मिळत आहे भली मोठी सूट, Offer जाणून थक्क व्हाल

नवीन Pulsar N250 च्या किंमती देखील 10 एप्रिल रोजी जाहीर होतील. टेस्टदरम्यान ही बाईक अनेक वेळा दिसली आहे. टेस्टदरम्यान, या मॉडेलमध्ये बरेच मोठे बदल दिसून आले आहेत. नवीन मॉडेल विशेषत: तरुणांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. बाईकमध्ये डिजिटल स्पीडोमीटर देखील असेल, ज्यामध्ये ग्राहकांना वेगवेगळी माहिती मिळेल.  (Latest Marathi News)

एका रिपोर्ट्सनुसार, नवीन Pulsar N250 मध्ये 249.07cc ऑइल कूल्ड इंजिन मिळेल. जे 24.5PS पॉवर आणि 21.5Nm टॉर्क जनरेट करेल. याशिवाय बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्सची सुविधा असेल. नवीन मॉडेलचे इंजिन पॉवर आणि मायलेजनुसार सेट केले जाईल. सुरक्षिततेसाठी, बाईकमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह ड्युअल चॅनल एबीएस देखील असेल.

Bajaj Pulsar N250
Upcoming Cars: 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत लवकरच लॉन्च होणार या 3 एसयूव्ही, पाहा लिस्ट

किती असेल किंमत?

बजाज ऑटोला नवीन Pulsar N250 च्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र असं बोललं जात आहे की, नवीन मॉडेलची किंमत विद्यमान प्रकाराच्या तुलनेत सुमारे 10,000 रुपयांनी जास्त असू शकते. सध्याच्या मॉडेलची एक्स-शो रूम किंमत 1,49,978 लाख रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com