Tata Punch EV वर पहिल्यांदा मिळत आहे भली मोठी सूट, Offer जाणून थक्क व्हाल

Discounts on Tata Punch EV: टाटाची सर्वात लोकप्रिय कार 'पंच'चा इलेक्ट्रिक व्हॅरिएंट कंपनीने यावर्षी जानेवारीमध्ये लॉन्च केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स पहिल्यांदाच या एसयूव्हीवर मोठी सूट देत आहे.
Offers on Tata Punch EV
Offers on Tata Punch EVSaam Tv

Offer on Tata Punch EV:

टाटाची सर्वात लोकप्रिय कार 'पंच'चा इलेक्ट्रिक व्हॅरिएंट कंपनीने यावर्षी जानेवारीमध्ये लॉन्च केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स पहिल्यांदाच या एसयूव्हीवर मोठी सूट देत आहे. कंपनी फक्त याच्या टॉप व्हेरियंटवर सूट देत आहे.

तुम्ही या महिन्यात Tata Punch EV खरेदी केल्यास, तुम्हाला यावर 50,000 रुपयांची सूट मिळेल. टाटा पंच ही आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. ही पेट्रोल आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. यातच आपण पंच वर उपलब्ध असलेली ऑफर आणि याच्या फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Offers on Tata Punch EV
MG Hector: पॉवरफुल इंजिन, दमदार लूक; एमजी हेक्टरचा Blackstorm एडिशन 10 एप्रिलला होणार लॉन्च, किंमत किती?

50,000 रुपयांची सूट

कंपनी Tata Punch EV वर 50,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही सूट फक्त याच्या टॉप-स्पेक पंच EV Empowered + S LR AC फास्ट चार्जरवर उपलब्ध आहे. याची किंमत 10.98 लाख ते 15.49 लाख रुपये आहे. म्हणजेच या महिन्यात तुम्ही ही कार खरेदी केल्यास तुम्हाला या सुटीचा लाभ घेता येईल. पंच EV च्या फीचर्स आणि रेंजबद्दल जाणून घेऊया….  (Latest Marathi News)

रेंज आणि फीचर्स

टाटा पंच EV एकाच चार्जवर दोन वेगवेगळ्या बॅटरी पर्यायसह 315 किलोमीटर आणि 421 किलोमीटरपर्यंतची रेंज ऑफर करते. सेफ्टीसाठी यात एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, डिस्क ब्रेक, ऑटोमॅटिक पार्किंग ब्रेक, 360-डिग्री कॅमेरा, हरमन साउंड सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप बटण आणि तापमान नियंत्रण यांसारखी फीचर्स आहेत.

Offers on Tata Punch EV
Upcoming Cars: 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत लवकरच लॉन्च होणार या 3 एसयूव्ही, पाहा लिस्ट

डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने ही कार फक्त 56 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. जो एक प्लस पॉइंट देखील आहे. टाटा पंच EV, Smart, Smart+, Adventure, Empowered आणि Empowered+ या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com