MG Hector: पॉवरफुल इंजिन, दमदार लूक; एमजी हेक्टरचा Blackstorm एडिशन 10 एप्रिलला होणार लॉन्च, किंमत किती?

MG Hector Blackstorm Edition: एमजी मोटर इंडिया आता आपल्या सर्वात लोकप्रिय SUV Hector चा नवीन Blackstorm एडिशन लॉन्च करणार आहे.
MG Hector Blackstorm Edition
MG Hector Blackstorm EditionSaam Tv

MG Hector Blackstorm Edition:

एमजी मोटर इंडिया आता आपल्या सर्वात लोकप्रिय SUV Hector चा नवीन Blackstorm एडिशन लॉन्च करणार आहे. कंपनी 10 एप्रिल रोजी ही नवीन कार सादर करेल आणि त्याच वेळी याची किंमत देखील जाहीर केली जाईल. नवीन एडिशनमध्ये काही नवीन फीचर्स पाहता मिळतील.

लॉन्च होण्याआधीच कंपनीने याचा एक फोटो शेअर केली आहे. हेक्टर ही आपल्या सेगमेंटमधील एक जबरदस्त एसयूव्ही आहे. हेक्टरच्या नवीन ब्लॅकस्टॉर्म एडिशनमध्ये तुम्हाला काय खास मिळणार? हेच आपण जाणून घेणार आहोत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MG Hector Blackstorm Edition
Upcoming Cars: 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत लवकरच लॉन्च होणार या 3 एसयूव्ही, पाहा लिस्ट

Hector Blackstorm Edition काय आहे?

कंपनीने नवीन एडिशनचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यानुसार हेक्टर नवीन डिझाइनसहा पाहायला मिळेल. याच्या पुढील बाजूस डार्क क्रोम ग्रिल, स्मोक्ड हेडलॅम्प, स्मोक्ड टेल लाइट्स, ब्लॅकस्टोर्म बॅज, रेड डिस्कसह 18-इंच अलॉय व्हील, कॅलिपर आणि रेड ॲक्सेंट असतील. याशिवाय फॉग लॅम्पच्यावर आणि साइड मिररमध्ये रेड हायलाइट्स असतील. हेक्टर ब्लॅकस्टॉर्म पूर्णपणे ब्लॅक रंगात असेल, जी दिसायला खूपच आकर्षक आहे. (Latest Marathi News)

हेक्टर ब्लॅकस्टॉर्मचा आतील भाग देखील पूर्णपणे ब्लॅक थीम असेल आणि रेड हायलाइट्स येथे दिसतील. 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज, हिल असिस्ट कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टीम यांसारखी अनेक जबरदस्त फीचर्स या एसयूव्हीमध्ये पाहायला मिळणार.

MG Hector Blackstorm Edition
Electric Scooter: सीएसटी-पनवेल-सीएसटी; जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत

हेक्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशनला पॉवर देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा एकच सेट असेल. यामध्ये 1.5-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 2.0-लिटर डिझेल इंजिन समाविष्ट आहे, तर ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि CVT समाविष्ट असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com