Nanded Police News : शाब्बास नांदेड पोलिस! चाेरीस गेलेले 164 मोबाईल हस्तगत, 70 नागरिकांना केले परत

Nanded Latest Marathi News : नांदेड पोलिसांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर आणि एक्सवर ईएमआय नंबरची यादी जाहीर केली आहे. नागरिकांनी संकेतस्थळांना भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
nanded police returns 70 mobile to owners
nanded police returns 70 mobile to ownerssaam tv

- संजय सूर्यवंशी

Nanded :

नांदेड पोलिसांच्या विशेष पथकाने चोरीला गेलेले तब्बल 164 मोबाईल हस्तगत केले हाेते. त्यापैकी 70 मोबाईल नागरिकांना पाेलिसांनी नुकतेच परत केले. चाेरीस गेलेला आपला माेबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेह-यावर समाधान हाेते. नागरिकांनी नांदेड पाेलिसांचे आभार मानले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सार्वजनिक ठिकाणाहून आणि बाजारातून मोबाईल चोरी होण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मोबाईल चोरीला गेला की नागरिक मोबाईल परत मिळेल याची आशाच सोडून देतात.

nanded police returns 70 mobile to owners
Parbhani DCC Bank : काॅंग्रेस आमदार सुरेश वरपूडकरांना धक्का, परभणी जिल्हा बॅंक अध्यक्षपद धाेक्यात

चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने नुकतेच चोरीला गेले तब्बल 164 मोबाईल जप्त केले. पोलिस अधीक्षक कोकाटे यांच्या हस्ते 70 जणांना मोबाईल परत देण्यात आले.

उर्वरित मोबाईल नागरिकांनी आपले ईएमआय नंबर देऊन न्यावेत असे आवाहन नांदेड पाेलिसांकडून करण्यात आला आहे. दरम्यान मिळालेल्या मोबाईलचे ईएमआय नंबरची यादी फेसबुकवर नांदेड पोलिस आणि ट्विटर वर नांदेड पोलीस या संकेतस्थळी टाकण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

nanded police returns 70 mobile to owners
Sharad Pawar News : सातारा लाेकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांची माघार, शरद पवार निवडणुकीच्या मैदानात? (Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com