IAF Agniveer Vayu Recruitment 2024:  भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी; १२ वी पास उमेदवार करु शकणार अर्ज
IAF Agniveer Vayu Recruitment 2024Saam TV

IAF Agniveer Vayu Recruitment 2024: भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी; १२ वी पास उमेदवार करु शकणार अर्ज

IAF Agniveer Vayu Recruitment 2024 Application Process: भारतीय वायुसेनेत भरती सुरु आहे. अग्निनीवीर म्हणून हवाई दलात भरती सुरु आहे. यासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.

देशाची सेवा करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी अनेक आर्मीत, नौदलात आणि वायुसेनेत काम करतात. जर तुम्हालाही वायुसेनेत काम करण्याची तुमची इच्छा असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. अग्निवीर म्हणून हवाई दलात भरती सुरु आहे.

भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निवीरवायू इनटेक 02/2025 साठी भरतीची अधिसूनचा जाहीर केली आहे. यासाठी तुम्ही agnipathvayu.cdac.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

IAF Agniveer Vayu Recruitment 2024:  भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी; १२ वी पास उमेदवार करु शकणार अर्ज
Bank Recruitment 2024: बँकेत नोकरीची मोठी संधी ; ९००० हून अधिक पदे, IBPS द्वारे भरती, शेवटची तारीख कधी?

तरुण उमेदवारांना भारतीय सशस्त्र दलात काम करण्याची उत्तम संधी आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ८ जुलैपासून सुरु होणार आहे. २८ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पुरुष आणि महिला या दोन्ही उमेदवारांसाठी ही संधी आहे. यासाठी १८ ऑक्टोबरपासून निवड परीक्षा घेण्यात येणार आहे.

या अग्निवीर भरतीसाठी उमेदवाराने इंटरमीडिएट (बारावी) परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच गणित आणि भौतिकशास्त्रात किमान ५० टक्के आणि इंग्रजीच ५० टक्के गुणांनी उत्तीरण असणे गरजेचे. उमेदवाराने ३ वर्षांचा अंभियात्रिकीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यात ते ५० टक्के गुणांनी पास असणे गरजेचे आहे. तर इंग्रजीमध्येही ५० टक्के गुणांनी पास असणे गरजेचे आहे. किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याबाबत अधिक माहिती भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे.

IAF Agniveer Vayu Recruitment 2024:  भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी; १२ वी पास उमेदवार करु शकणार अर्ज
IRCTC Recruitment 2024: IRCTC मध्ये नोकरीची मोठी संधी; टुरिझम मॉनिटर पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

यासाठी उमेदवाराचा जन्म ३ जुलै २००४ ते ३ जानेवारी २००८ मध्ये झाला असावा. यासाठी अविवाहित उमेदवार पात्र आहेत. या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ५५० रुपयांचे शुल्क भरावे लागेल. अधिक माहितीसाठी https://agnipathvayu.cdac.in/AV/img/upcoming/AGNIVEER_VAYU_02-2025.pdf या साइटवर क्लिक करा.

IAF Agniveer Vayu Recruitment 2024:  भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी; १२ वी पास उमेदवार करु शकणार अर्ज
Government Job: परीक्षा न देताच सरकारी नोकरीची मोठी संधी; NMDC मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com