

एलपीजी गॅस सिलिंडरसाठी मिळते सब्सिडी
सिलिंडरच्या मूळ किंमतीवर ३०० रुपयांची सूट
९१३ रुपयांचा गॅस फक्त ६१३ रुपयांना मिळणार
इराण-इस्त्रायल युद्धामुळे जगावर परिणाम झाला आहे. युद्धाचा थेट परिणाम इंधनावर झाला आहे. कच्च्या तेलाची आयात होत नाहीये. त्यामुळे इंधनामध्ये तुटवडा जाणवत आहे. एलपीजी गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे किंमतीतदेखील वाढ करण्यात आली आहे. एलपीजी घरगुती गॅसच्या किंमती ६० रुपयांनी महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. एलपीजी गॅसच्या किंमती ९१३ रुपये झाल्या आहेत. दरम्यान, या सगळ्यातदेखील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कोट्यवधी ग्राहकांना गॅसच्या किंमती ३०० रुपयांची सवलत मिळत आहे.
कशी मिळणार सवलत?
प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या (PM Ujjawala Yojana) लाभार्थ्यांना सब्सिडी दिली जाते. एलपीजी सिलिंडरवर ३०० रुपयांची सब्सिडी दिली जाते. मे २०१६ पासून या योजनेची सुरुवात झाली. यामध्ये वर्षभरात ३ सिलिंडरवर सब्सिडी दिली जाते. यामुळे गरीब कुटुंबांना आधार मिळणार आहे. पीएम उज्जवला योजनेचे जवळपास १० कोटी लाभार्थी आहेत. त्यांना सब्सिडी मिळते.
किती रुपयांना मिळणार सिलिंडर
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन वेबसाइटनुसार, किंमती वाढल्यानंतर एलपीजी सिंलिंडरची किंमत ९१३ रुपये झाली आहे. यावर ३०० रुपयांची सब्सिडी मिळणार आहे. म्हणजेच लाभार्थ्यांना ६१३ रुपयात गॅस सिलिंडर मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्जवला योजनेत एलपीजी गॅसचं मोफत कनेक्शन दिले जाते. त्यामुळे डिस्ट्रीब्युटरला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. यामुळे लाभार्थ्यांना खूप फायदा होणार आहे. तुम्हाला जर अजूनही अर्ज करायचा असेल तर https://pmuy.gov.in वेबसाइटवर जाऊन करु शकतात. याशिवाय ऑफलाइन पद्धतीने कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन अर्ज करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.