

पीएम उज्जवला योजनेत मिळणार मोफत गॅस सिलिंडर
योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य
आधार ऑथेंटिकेशन करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस
केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला योजना सुरु केली आहे. पीएम उज्जवला योजनेत महिलांना वर्षातून ३ वेळा मोफत गॅस सिलिंडर दिले जातात. महिलांच्या खात्यावर गॅस सब्सिडीचे पैसे जमा केले जातात. दरम्यान, आता पीएम उज्जवला योजनेत बायोमेट्रिक करणे गरजेचे आहे. आता योजनेचे लाभार्थी कोणत्याही शुल्काशिवाय बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन करु शकतात. जर तुम्ही आधार ऑथेंटिकेशन केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
एलपीजी गॅसधारकांना बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन प्रक्रिया आता आणखी सोपी होणार आहे. तुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटात आधार ऑथेंटिकेशन करु शकतात.
आधार ऑथेंटिकेशन कसे करायचे? (How to do Aadhaar Authentication Under PM Ujjawala Yojana)
सर्वात आधी तुम्हाला https://pmuy.gov.in/e-kyc.html या वेबसाइटवर जायचे आहे. तिथे तुम्हाला आधार ऑथेंटिकेशनचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन तुम्ही फेस ऑथेंटिकेशन करु शकतात.यावर तुम्हाला तेल कंपनीचा अॅप आणि आधार फेस आरडी अॅप दिसणार आहे. हा अॅप डाउनलोड करायचा आहे. त्यावर दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्हाला आधार कार्ड ऑथेंटिकेशन करायचे आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आणि निःशुल्क असणार आहे. यासंदर्भात तुम्ही तुमच्या घराजवळील एलपीजी गॅस वितरण करणाऱ्याशी संपर्क साधा किंवा 1800 2333 555 या नंबरवर संपर्क करा.
आधार ऑथेंटिकेशन केले नाही तर एलपीजी गॅस मिळणार नाही
उज्जवला योजनेत आठव्यांदा आणि नवव्यांदा गॅस भरताना आधार प्रमाणिकरण अनिवार्य आहे.
बायोमेट्रिक केले नाही तर तुम्हाला सातव्यांदा गॅस रिफिल केल्यानंतर पैसे मिळत नाही. तुमची सब्सिडी रोखली जाईल.
वर्षातून तुम्हाला दोनदा आधार ऑथेंटिकेशन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.