PM Ujjawala Yojana: खुशखबर! मोफत LPG गॅस मिळणार; कुठे अन् कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर

PM ujjawala Yojana Free Gas Connection: पीएम उज्जवला योजनेअंतर्गत महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते. मोफत एलपीजी गॅस मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
LPG Gas
LPG GasGoogle
Published On
Summary

पीएम उज्जवला योजना

महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन

मोफत गॅस मिळणार

केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या खास महिलांसाठी आहेत. यामधील अनेक योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत दिली जाते. तर अनेक योजनांमध्ये विविध पद्धतीने मदत केली जाते. अशीच एक योजना म्हणजे पीएम उज्जवला योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गरीक कुटुंबाला मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते.

LPG Gas
Government Scheme: २१ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये जमा; नेमकी योजना आहे तरी काय?

घराघरात गॅस कनेक्शन असावे, हे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट आहे. सुरुवातीला महिला चुल्हीवर जेवण बनवायच्या. यामुळे महिलांना धुराचा खूप त्रास व्हायचा. यामुळे आजारदेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने ही उज्जवला योजना सुरु केली. यामुळे लाखो कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर मिळतो.

ज्या महिला चुल्हीवर जेवण बनवायच्या. त्यांच्यासाठी ही योजना राबवली आहे. या योजनेत गरीब कुटुंबातील लोक लाभ घेऊ शकतात. सिलिंडरसाठी महिलांना सब्सिडी दिली जाते.

या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील नागरिक घेऊ शकतात. ज्यांचे नाव SECC 2011 मध्ये आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत अनुसुचित जाती, जमाती, मागासवर्ग आणि पीएम आवास योजना किंवा अंत्योदय कार्डधारक योजनेचा लाभ घेऊ शकतात.

LPG Gas
Success Story: शाळेत गोल्ड मेडल, सिविल इंजिनियरिंग केलं,नंतर UPSC क्रॅक; IPS सृष्टी गुप्ता यांचा प्रवास

प्रधानमंत्री उज्जवला योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि पासपोर्ट साइज फोटो असायला हवा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एलपीजी पोर्टलवर जावे लागेल. ऑफलाइन पद्धतीने गॅस एजन्सीमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.

LPG Gas
Post Office SCSS Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २.४६ लाख रुपये; कॅल्क्युलेशन वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com