CM Mahila Rojgar Yojana
CM Mahila Rojgar YojanaSaam Tv

Government Scheme: २१ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये जमा; नेमकी योजना आहे तरी काय?

CM Mahila Rojgar Yojana: बिहार सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज महिलांच्या खात्यात १०,००० रुपये जमा झाले आहेत.
Published on
Summary

बिहार सरकारची महिलांसाठी खास योजना

मुख्यमंत्री महिला रोजगार योजना

महिलांच्या खात्यात १०,००० रुपये जमा

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.केंद्रानंतर अनेक राज्य सरकारनेही राबवल्या आहेत.महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. तर बिहार सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना राबवली आहे. दरम्यान, आज या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १०-१० हजार रुपये जमा केले जाणार आहे. आज हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

CM Mahila Rojgar Yojana
Government Scheme: या सरकारी योजनेत १५०० ऐवजी मिळणार २५०० रुपये; निधी वाढवला; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुख्यमंत्री महिला रोजगार योजना (CM Mahila Rojgar Yojana)

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत २१ लाख महिलांच्या खात्यात १०-१० हजार रुपये जमा केले जाणार आहे. आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे २१०० कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३ हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. याआधी दोनदा महिलांना पैसे मिळाले आहेत. त्यानंतर आज तिसरा हप्ता जमा केला आहे. या योजनेअंतर्गत १.२१ कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पैसे जमा करण्यात आले आहेत.

तुम्हाला पैसे आले की नाही?

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी तुम्ही अर्ज केला आहे आणि तुम्ही पात्र आहात तर तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले त्यांच्या फोनवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहेत. दरम्यान, अजूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही.लवकरच महिलांना पैसे दिले जातील.

CM Mahila Rojgar Yojana
Small Saving Schemes: सरकारचा मोठा निर्णय! बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे वैसे; वाचा सविस्तर

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या असाव्या. तुम्ही तुमच्या शहरानुसार अर्ज करु शकतात. याचसोबत ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे.

CM Mahila Rojgar Yojana
PPF Scheme: सरकारची जबरदस्त योजना! दिवसाला ४१६ रुपये गुंतवा अन् ४१.३५ लाख मिळवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com