IIIT Pune Vacancy: पुण्यातील IIITमध्ये नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील

IIIT Pune Vacancy: भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पूणे यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातेय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. जाणून घेऊया अर्ज करण्याची सोपी पद्धत.
IIIT Pune Vacancy
IIIT Pune VacancySaam Tv
Published On
Summary
  • IIIT पुणेकडून मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलीय.

  • वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेच्या अटी लागू करण्यात आलीय.

  • अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन उपलब्ध आहे.

नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी मोठी संधी चालून आलीय. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पूणे यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातेय. इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकरात अर्ज करावा. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे.

अर्ज करण्याची सोपी पद्धत

ही भरती प्रक्रिया फक्त एका जागेसाठी केली जात आहे. 'रिसर्च असोसिएट I' पदासाठी फक्त एकाच जागेसाठी नोकरभरती केली जात आहे. Computer Science आणि Engineering/ Information Technology/ Electronics आणि Communication Engineering/ Computer Application/ Computer Science या विषयात पीएच.डी. पूर्ण असलेले उमेदवार 'रिसर्च असोसिएट I' पदासाठी अर्ज करू शकतील.

दरम्यान भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती उमेदवाराला https://www.iiitp.ac.in/ या साईटवर मिळेल. इच्छुक उमेदवाराला गुगल फॉर्मच्या माध्यमातून अर्ज भरायचे आहे. गुगल फॉर्मच्या माध्यमातूनच अर्जदाराला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल.

IIIT Pune Vacancy
Maha Metro Recruitment: खुशखबर! महा मेट्रोमध्ये नोकरीची संधी; पगार मिळणार २,८०,००० रुपये; अर्ज कसा करावा?

भरती प्रक्रियेची माहिती -

24 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या अर्जप्रक्रियेची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर आहे. 08 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतर पुढे ती गुगल फॉर्म लिंक बंद होईल.

IIIT Pune Vacancy
Anganwadi Bharti: खुशखबर! अंगणवाडीत सर्वात मोठी भरती; ६९००० पदे भरली जाणार; वाचा सविस्तर

रेल्वेत नोकरीची संधी

रेल्वेत ऑक्टोबर महिन्यात नवीन भरती निघणार आहे. रेल्वेत विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण २५७० पदांसाठी भरती केली जाईल. ज्युनिअर इंजिनियर, डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट आणि मेकॅमिक मेटलर्जिकल असिस्टंट या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.rrbapply.gov.i वर जाऊन अर्ज करू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com