Small Saving Schemes: सरकारचा मोठा निर्णय! बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे वैसे; वाचा सविस्तर

Small Saving Schemes Interest Rate: सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल सरकारने केलेला नाहीये. यामुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.
Small Saving Schemes
Small Saving SchemesSaam Tvv
Published On

सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्रालयाने लहान योजनांवरील व्याजदराची घोषणा केली आहे. हे व्याजदर तिमाही आधारावर लागू केले जाते. दरम्यान, आता बचत योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहे. या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. हे व्याजदर पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी लागू होणार आहे.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि इतर योजनांवर मिळणारे व्याजदर हे जैसे थे वैसे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनादिलासा मिळाला आहे.

Small Saving Schemes
Post Office Schemes : बचत छोटी नफा मोठा ! महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या खास 4 योजना

गुंतवणूकदारांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. मध्यंतरी जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कमी केला होता. तेव्हादेखील सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत खात्यातील व्याजदरात कपात केली नव्हीत.त्यानंतर आता पुन्हा व्याजदर जैसे थे वैसे ठेवण्यात आले आहे.रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटवर व्याजदर किती द्यायचे हे ठरवले जाते. त्यानुसार व्याजदर कमी जास्त होते.

आरबीआयने रेपो रेटमध्ये केली कपात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. सलग तीन वेळा एकूण १०० बेसिस पॉइंट्सने कपात केली होती.सुरुवातीला रेपो रेट ६.५ टक्के होता. त्यानंतर यात दोनदा २५-२५ आणि जून महिन्यात ५० बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. त्यामुळे रेपो रेटमध्ये जवळपास १ टक्क्यांनी कपात झाली आहे.

Small Saving Schemes
Government Scheme: महिलांच्या खात्यात आज जमा होणार ₹१००००, नेमकी योजना आहे तरी काय?

बचत योजनांवरील व्याजदर

बचत योजनांवरील व्याजदरात शेवटचा बदल जानेवारी-मार्च २०२४ या कालावधीत केला होता. यावेळी ३ वर्षांच्या टाइम डिपॉझिटवरील व्याजदर ७ टक्क्यांवरुन ७.१ टक्के करण्यात आले होते. तर सुकन्या समृद्धी योजनेत व्याजदर ८ टक्क्यांवरुन ८.२ टक्के करण्यात आले होते.दरम्यान, बाकीच्या योजनांवरील व्याजदर जैसे थे वैसे ठेवण्यात आले होते.

Small Saving Schemes
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! महिन्याला ५००० रुपये गुंतवा अन् ८.५ लाख मिळवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com