Video : नाईटक्लबमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, २५ जणांचा होरपळून मृत्यू, दुर्घटनेचा भयानक व्हिडिओ

Goa Nightclub Video News : उत्तरस गोव्यातील अर्पोरा परिसरात नाईटक्लबमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
Goa nightclub gas cylinder blast viral video details
Goa nightclub gas cylinder blast viral video details
Published On

Goa nightclub gas cylinder blast viral video details : उत्तर गोव्यामध्ये नाईटक्लबमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. अर्पोरा परिसरात झालेल्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाईटक्लबचे कर्मचारी, विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या दुःखद घटनेचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीचा भडका वाढला. काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीला आग लागली. जीव वाचवण्यासाठी लोक बेसमेंटमध्ये पळाले. पण तिथेच होरपळून अन् गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये आग कशी वेगाने पसरली आणि संपूर्ण क्लब धूर आणि ज्वाळांनी वेढल्याचे दिसतेय.

Goa nightclub gas cylinder blast viral video details
Special Trains : गुड न्यूज! महाराष्ट्रातून धावणार १४ स्पेशल ट्रेन, मुंबई-पुण्यातून किती अन् कोणती ट्रेन धावणार?

प्राथमिक तपासात गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचे दिसून येत असल्याचे गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, शनिवारी रात्री १२:०४ वाजता ही घडली. पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या दुर्घटनेचा तपास करण्यात येत आहे.

Goa nightclub gas cylinder blast viral video details
Pune : पुण्यात रक्तरंजित थरार! पार्कात बोलावून मित्रानेच केला घात, तोंडावर अन् डोक्यावर २५ वार

आगीनंतरचे भयावह दृश्य -

आग विझल्यानंतर नाईटक्लबचे जळालेले अवशेष दिसणारा व्हिडिओ समोर आला आहे. इमारतीच्या खिडक्या, दरवाजे आणि आतील भाग पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसतेय. रोमियो लेनमधील बर्च नावाचा हा क्लब एक लोकप्रिय पार्टी स्पॉट मानला जातो. दरम्यान, मृतांपैकी बहुतेक जण क्लबमध्ये काम करणारे कर्मचारी होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

Goa nightclub gas cylinder blast viral video details
Nightclub Fire : गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २३ जणांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com