Goa nightclub fire Death Toll : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या अपघातात २३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. या दुर्घटनेबाबत दुख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Goa nightclub fire latest updates)
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोव्यामध्ये मध्यरात्री १२ वाजताच्या आसपास अर्पोरा येथील एका रेस्टॉरंटमध्ये आगीचा भडका उडाला. सिलिंडरच्या ब्लास्टमुळे रेस्टॉरंटमध्ये आगीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमनल गलाचे अधिकारी आणि रूग्णवाहिका घटनास्थळावर दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झालाय. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. पोलिसांकडूनही या घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेय. दरम्यान, मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी ते म्हणाले, अर्पोरा येथे झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ज्यांनी जीव गमावला त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. गोवा सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल. यामध्ये कोणी दोषी असेल त्याला अटक केली जाईल. पर्यटन स्थळावर अशी घटना होणं दु:खद आहे.
या दुर्घटनेत २० पुरूष आणि ३ महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये विदेशी नागरिकाचा समावेश आहे. रेस्टॉरंटच्या बेसमेंटमध्ये काम कऱणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. स्थानिक भाजप आमदार मायकल लोबो यांनी घटनास्थळी भेट दिली. ते म्हणाले की, गोव्यातील इतर क्लबचे सुरक्षा ऑडिट करण्याची आवश्यकता आहे. अर्पोरा येथे घडलेल्या दुर्घटनेसारख्या घटना पुन्हा घडू नयेत, त्यामुळे ऑडिट करण गरजेचं आहे. देश-विदेशातून पर्यटक नेहमीच गोव्याला सुरक्षित ठिकाण मानत आले आहेत. पण शनिवारी लागलेली ही आग खूप भयानक होती. अशा घटना पुन्हा घडू नयेत. पर्यटकांची आणि या ठिकाणी काम करणाऱ्यांची सुरक्षा खूप महत्वाची आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.