18-year-old stabbed 25 times in Pune park : रक्तरंजित थराराने पुणे शहर पुन्हा एकदा हादरलेय. शनिवारी रात्री ८ वाजता चंदननगरमधील पार्कात रक्ताचा सडा पडला. दोन जणांनी एका मित्राला पार्कात बोलवून हत्या केली. पूर्ववैमानस्यातून १८ वर्षाच्या तरूणाची चाकूने २० ते २५ वेळा वर करत हत्या केली. सोनू ऊर्फ लखन सकट वाघमारे (वय १८, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंदननगर येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथील गार्डनमध्ये शनिवारी रात्री दोघा तरुणांवर चाकूने वार करण्यात आले. त्यातील एका युवकाचा मृत्यु झाला असून दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमानस्य आणि स्थानिक वादावादीतून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुण्यातील येरवडामधील चंदननगर परिसरात असलेल्या ऑक्सिजन पार्क उद्यानात रक्तरंजित थरार झाला. पूर्ववैमनस्यातील भांडणे मिटविण्यासाठी बोलावलं. मित्राच्या शब्दामुळे सोन्या पार्कात गेला. पण तिथे घात झाला. त्याच्यावर चाकून सपासप वार करण्यात आले. शनिवारी रात्री ८ वाजता सोनूवर ऑस्किजन पार्कात हल्ला झाला. हल्लेखोरांनी सोनूवर २० ते २५ वार केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. सोनूवर चाकूने वार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढलाय. हल्ल्याची माहिती मिळताच चंदननंगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सोनू याचा मतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवलाय. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहे. चंदननगर पोलिसांकडून खुनाचा तपास वेगाने सुरू आहे.
चंदननगरमधील या रक्तरंजित थरारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सोनू याची हत्या करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकऱणी गुन्हा दाखल झाला आहे. हल्लेखोर फरार असून पोलीस त्याचा तपास करतआहे. यश गायकवाड आणि प्रथमेश दर्डू यांनी सोनूवर वार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर चंदननगर परिसरात खळबळ उडाली आहे. मित्राने बोलवल्यामुळे सोनू पार्कात केला होता. पण त्याचा घात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू आणि आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी कडाक्याची भांडणे झाली होती. सोनू याला आरोपीने चंदननगर परिसरात असणाऱ्या ऑक्सिजन पार्कात बोलवले होते. भांडणे मिटविण्यासाठी चंदन उद्यानात आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत एक अल्पवयीन मित्र होता. सोनू पार्कात येताच आरोपी प्रथमेश दर्डू आणि यश गायकवाड यांनी हल्ला चढवला. यामध्ये सोनूचा मृत्यू झाला तर मित्र वाचला. तो गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.