LPG Cylinder Price :एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, तुमच्या शहरात दर किती? वाचा

19kg LPG cylinder new rate in Delhi Mumbai Kolkata Chennai : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरची नवी किंमत १५९०.५० रुपये झाली आहे. मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही.
LPG Cylinder
LPG CylinderSaam TV
Published On

commercial LPG cylinder price reduced by ₹5 today : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज कपात करण्यात आली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्याकडून महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरच्या दराचे मूल्यमापन केलेय. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात किंचित कपता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 19 किलो वजनाचा व्यावसियाक गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये आता 1590.50 रुपये इतकी झाली आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil) घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळेच बॉयप्रोडक्ट लिक्विड पेट्रोलियम गॅस अथवा एलपीजीच्या (Liquid Petroleum Gas) किंमतीतही कपात करण्यात आली आहे. 19 किलो वजनाच्या कॉमर्शियल (व्यावसायिक) एलपीजी सिलिंडरच्या दरात पाच रूपये कपात करण्यात आली आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहे. त्याआधी एक ऑक्टोबर रोजी व्यावसाकिय गॅस सिलिंडरच्या दरात 15.50 रुपयांची वाढ कऱण्यात आली होती. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेल्या सिलिंडरच्या दराचे मूल्यमापन केले जाते. त्यानुसार, किंमती ठरवल्या जातात.

LPG Cylinder
Mumbai Hostage : १७ मुलांची सुटका अन् पुण्याचा आरोपी पिंजऱ्यात...मुंबईतल्या हायप्रोफाइल पवईत ओलीसनाट्याचा थरार

सध्या किती असेल किंमत ?

सरकारी कंपनी इंडियन ऑयलच्या (IOC) संकेतस्थळानुसार, 19 किलो वजनाच्या सिलिंडरच्या किंमतीत ५ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सिलिंडरची किंमत 1590.50 रुपये इतकी झाली आहे. याआधी ही किंमत 1595.50 रुपये इतकी होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही कपात अथवा वाढ झालेली नाही. १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये ८५३ रूपये इतकीच आहे. तर कोलकातामध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत आता १६९४.०० रुपये झाली आहे. मुंबईत आता ते १५४२.०० रुपये, तर चेन्नईमध्ये ते १७५०.०० रुपये इतकी किंमत झाली आहे.

LPG Cylinder
Tamhini Ghat Accident : काळाचा घाला! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, सनरुफ तोडून दगड कारमध्ये पडले, महिलेचा जागीच मृत्यू

६ महिन्यात २२३ रूपयांनी स्वस्त -

एक ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १५.५० रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्याआधी सलग सहा महिने सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. या वर्षी मार्च महिन्यात दिल्लीत या सिलिंडरची किंमत १८०३ रुपये होती. सहा महिन्यात सिलिंडरच्या किंमतीत २२३ रूपयांनी कपात झाली.

LPG Cylinder
Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com