Mumbai Hostage : १७ मुलांची सुटका अन् पुण्याचा आरोपी पिंजऱ्यात...मुंबईतल्या हायप्रोफाइल पवईत ओलीसनाट्याचा थरार

Mumbai Powai Children Hostage: मुंबईच्या पवईत वेबसीरीज ऑडिशनच्या बहाण्याने १७ मुलांना ओलीस ठेवण्याचा धक्कादायक प्रकार. पोलिसांनी शिताफीने मुलांची सुटका केली. पुण्याचा रोहित आर्या अटकेत. गुंतवणूक नुकसानीच्या कारणावरून आरोपीने हे पाऊल उचलल्याची माहिती.
Mumbai Powai 17 children rescue fake audition hostage case
Mumbai Police rescue 17 children from fake web series audition trap in Powai; accused Rohit Arya arrestedSaam TV Marathi
Published On

Mumbai Powai 17 children rescue fake audition hostage case : अचानक एक व्हिडिओ रीलीज झाला. एक व्यक्ती त्यात दिसतेय. दिसणं जवळपास माथेफिरूसारखंच. व्हिडिओत बोलायला लागतेय की मुलांना बंधक ठेवलंय. मी काय दहशतवादी नाही, पण मला उकसवलं तर जिथं मुलांना ठेवलंय, ती इमारत पेटवून देईल....आता ही काय वेबसीरीज किंवा एखाद्या क्राइम थ्रीलर, सस्पेन्स चित्रपटाची स्टोरी नाहीये. खरंखुरं घडलंय. ते पण मुंबईचा हायप्रोफाइल एरिया पवईत.

"१७ मुलांना बंधक केलंय, माझ्या मागण्या मान्य करा.." पवई पोलीस स्टेशनमध्ये दुपारी फोन खणखणला अन् पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पुण्याच्या रोहित आर्य या व्यक्तीने हायप्रोफाइल पवईतच मुलांना बंधक बनवण्यासाठी प्लान आखला. तो प्लान काही प्रमाणात यशस्वीही झाला. वेबसीरीजच्या ऑडिशनच्या बहाण्याने आलेल्या १७ जणांना त्याने बंधक केलं. पुण्याच्या रोहित आर्य याचा प्लान मुंबई पोलिसांनी हाणून पाडला. पण रोहित आर्यने हे पाऊल का उचलले? त्याने १७ मुलांना बंधक बनवण्यासाठी काय काय केलं? ओलीस ठेवलेल्या मुलांची पोलिसांनी सुटका कशी केली? (Pune man Rohit Arya Powai hostage drama reason)

Mumbai Powai 17 children rescue fake audition hostage case
Local Body Election : राज्यातील निवडणुकीसाठी आयोगाचा नवा प्लान, तब्बल २०० कोटींचा खर्च वाढला, आचारसंहिता कधी लागणार?

मुलांची सुटका कशी केल? थरारानंतर पोलिसांनी काय सांगितले?

१.४५ वाजता पोलिस स्टेशनमध्ये एका व्यक्तीचा फोन आला. एका व्यक्तीने पवईमधील महावीर क्लासिक नावाच्या इमारतीत काही लहान मुलांना बंधक बनवून ठेवले. त्यानंतर आम्ही स्पेशल पथकाने आरोपीसोबत चर्चा केली. पवई पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एन्ट्री करून एका व्यक्तीच्या साह्याने मुलाची सुटका केली. आतमध्ये १७ मुलं, एक वयोवृद्ध व्यक्ती आणि एका नागरिकांची सुटका करण्यात आली.

Mumbai Powai 17 children rescue fake audition hostage case
Local Body Election : राज्यातील निवडणुकीसाठी आयोगाचा नवा प्लान, तब्बल २०० कोटींचा खर्च वाढला, आचारसंहिता कधी लागणार?

बंदक बनवणाऱ्याकडे एअरगन दिसतेय. आम्ही सर्च ऑपरेशन करत आहोत. संपूर्ण चौकशीनंतरच सर्वकाही समोर येईल. आरोपीचं बॅकग्राऊंड, मागण्या याचा तपास आम्ही करत आहोत. रोहित आर्य असं बंदक बनवणाऱ्याचे नाव आहे.वेब सिरिजच्या ऑडिशनसाठी मुलांना बोलवलं होतं. त्यासाठी हॉल रेंटवर घेतला होता. मुलं ऑडिशनला आले त्याच मुलांना त्याने बंदक बनवलं. मुलांना बंधक का ठेवलं? त्या कारणाचा शोध आम्ही घेत आहोत.

Mumbai Powai 17 children rescue fake audition hostage case
Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुलांची सुटका पुढे काय होणार ?

स्पेशल फोर्सच्या पथकाने एका व्यक्तीच्या मदतीने इमारतीमध्ये घुसून मुलांची सुटका केली. आरोपीकडे एअरगन आणि केमिकल होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका केली. मुलांच्या मनावर घटनेचा परिणाम होऊ नये म्हणून कौन्सिलर बोलवण्यात आला आहे. रोहित आर्य याने मुलांना ओलीस का ठेवले याचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आले आहे. मागील पाच ते सात दिवसांपासून या ठिकाणी शुटिंग चालू होते.मात्र आज दुपारी मुले जेवायला घरी गेली नाहीत त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रोहित याने यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला होता. पण पोलिसांनी शिताफीने रोहितचा डाव उधळून लावला.

Mumbai Powai 17 children rescue fake audition hostage case
Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

रोहित आर्यने अपहरणाचा कट का रचला ?

आरोपी रोहित आर्यने पैसे सरकारच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये लावले होते. त्याने कौट्यवधींची गुंतवणूक केली होती. त्यामध्ये त्याचं नुकसान झालं. त्यासाठी तो सरकारला आणि संबंधित विभागाला जबाबदार धरत होता. यासाठी त्याने सरकारशी संवाद साधण्यासाठी किंवा आपली बाजू ठेवण्यासाठी हे धोकादायक पाऊल उचललं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहित आर्य याचे जवळपास २ कोटी सरकारकडे थकीत होते.

व्हिडिओत रोहित आर्य काय म्हणाले ?

रोहित आर्य याने पवईमध्ये अनेक मुलांना ओलीस ठेवले. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल केला. व्हिडिओमध्ये त्याने विशिष्ट लोकांशी बोलण्याची मागणी केली. जर त्याला रोखले तर तो त्या जागेला आग लावेल आणि स्वतःला आणि मुलांना इजा करेल अशी धमकी व्हिडिओच्या माध्यामातून त्याने दिली होती.

Mumbai Powai 17 children rescue fake audition hostage case
Local Body Election : 10 नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता, नेमकी काय माहिती आली समोर?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com