Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Maharashtra politics latest marathi news : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला असून निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचार खर्च मर्यादेत तब्बल दीड पट वाढ केली आहे. महापालिका व नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना आता अधिक खर्च करण्याची मुभा मिळाली असून या निर्णयामुळे प्रचाराला गती मिळणार आहे.
Election Commission Local Body News
Maharashtra SEC increases campaign spending limit ahead of local body elections.Saam TV Marathi News
Published On

Maharashtra Local Body Election 2025 latest news update : महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात पडघम वाजले आहेत. निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. उमेदवारीसाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग केली जात आहे. कोणत्याही क्षणी राज्यातील निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. पण त्याआधीच राज्य निवडणूक आयोगाकडून इच्छुक उमेदवाराला आनंदाचा धक्का दिला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांच्या खर्च मर्यादित वाढ करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. ही वाढ थोडी नव्हे तर दीड पट आहे. याचा उमेदवाराला मोठा फायदा होणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना प्रचारासाठी जास्त आर्थिक मोकळीक मिळेल. गेल्या काही वर्षातील वाढलेली महागाई, मतदारांची संख्या, विविध खर्च पाहून आयोगाकडून उमेदवाराच्या खर्चात वाढ केली आहे.

Election Commission Local Body News
Local Body Election : राज्यातील निवडणुकीसाठी आयोगाचा नवा प्लान, तब्बल २०० कोटींचा खर्च वाढला, आचारसंहिता कधी लागणार?

खर्चाची मर्यादा किती होती? आता किती झाली ?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या खर्चामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. या आधी जिल्हा परिषदांसाठी सहा लाख आणि महापालिका निवडणुकांसाठी दहा लाखांची मर्यादा होती, ती आता वाढवण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी सदस्य संख्येच्या आधारावर खर्चमर्यादा ठरवली जायची, आता ती वर्गवारीनुसार ठरवली गेली आहे. साधारणपणे महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांसाठी खर्चाची मर्यादा आठ लाख ते दहा लाख होती ती आता नऊ लाख ते पंधरा लाख करण्यात आली आहे.

Election Commission Local Body News
Local Body Election : धुरळा उडणार, तयारीला लागा! 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, समोर आली अपडेट...

कोणत्या शहरातील उमेदवार किती खर्च करणार?

मुंबई महापालिका, पुणे महापालिका नागपूर महापालिका - १५ लाख रुपये

पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे महापालिका - १३ लाख रुपये

कल्याण डोंबिवली, छत्रपती संभाजी नगर, नवी मुंबई,वसई विरार - ११ लाख रुपये

ड वर्गातील 19 महापालिकांसाठी - ९ लाख रुपये

अ वर्ग नगर परिषद -

नगरसेवक -५ लाख रुपये

थेट नगराध्यक्ष- १५ लाख रुपये

ब वर्ग नगरपरिषद

नगरसेवक - साडेतीन लाख रुपये

नगराध्यक्ष - ११. २५ लाख रुपये

क वर्ग नगरपरिषद

नगरसेवक - २. ५०लाख रुपये

नगराध्यक्ष- ७. ५० लाख रुपये

नगरपंचायत

नगरसेवक-२. २५ लाख रुपये

नगराध्यक्ष- सहा लाख रुपये

Election Commission Local Body News
Local Body Election : 10 नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता, नेमकी काय माहिती आली समोर?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com