Local Body Election : धुरळा उडणार, तयारीला लागा! 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, समोर आली अपडेट...

Maharashtra Local Body Election schedule : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. १० नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, निवडणुका दोन टप्प्यांत पार पडतील.
Maharashtra Local Body Elections 2025
Maharashtra Election Commission gears up for Local Body Elections 2025; Code of Conduct expected from November 10.Saam TV Marathi
Published On

Maharashtra Local Body Election Date : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. पाच ते सात वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ च्या आतमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश आयोगाला दिले. कोर्टाच्या आदेशानंतर आयोगाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू कऱण्यात आली. पण निवडणुका लागणार कधी? हा प्रश्न राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यात घर करून होता. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणुकीची संभाव्य तारीख समोर आली आहे. Maharashtra local body election 2025 date and schedule

नगरपालिका निवडणूक कधी?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आहे. नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाकडून नगरपालिका निवडणुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. १० नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Local Body Elections 2025: Code of Conduct Likely from November 10)

Maharashtra Local Body Elections 2025
Nagpur : शेतकऱ्यांनो टोकाचं पाऊल उचलू नका, 2-4 मंत्र्यांना कापा, तुपकर आक्रमक

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते, असाही एक अंदाज आहे. जर अधिवेशानदरम्यान आचारसंहिता असेल तर सत्ताधाऱ्यांना एकही घोषणा करता येणार नाही. डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे आता राज्यात ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापणार आहे. (Maharashtra election commission update 2025 )

Maharashtra Local Body Elections 2025
Bihar Chhath Puja : छठ पूजेच्या उत्सवावर दु:खाचा डोंगर, बिहारमध्ये ८३ जणांचा मृत्यू

राज्यात आचारसंहिता कधी? Maharashtra municipal and zilla parishad elections details

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल महाराष्ट्रात लवकरच वाजणार आहे. आयोगाकडून संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन टप्प्यात या निवडणुका होऊ शकतात. येत्या १० नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील अधिसूचना लवकरच जारी केली जाणार असल्याचं कळतंय.त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचींना वेग आलाय.

Maharashtra Local Body Elections 2025
Nashik Accident: साई भक्तांवर काळाचा घाला, शिर्डीला जाताना कारचा चक्काचूर, ३ भाविकांचा जागीच मृत्यू

दोन टप्प्यात निवडणुका? Two-phase local body elections Maharashtra latest update

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ शकतात. या निवडणुका हिवाळी अधिवेशनाच्या आधी होतील. तर दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात. नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागणार लागण्याची शक्यता आहे. तर डिसेंबर अखेर महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते.

Maharashtra Local Body Elections 2025
Maharashtra politics : भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात डाव टाकला, अजित पवारांनंतर शिंदेंना दिला धक्का, २ महत्त्वाचे नेते गळाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com