Bihar Chhath Puja : छठ पूजेच्या उत्सवावर दु:खाचा डोंगर, बिहारमध्ये ८३ जणांचा मृत्यू

Bihar Chhath Puja Tragedy: बिहारमधील छठ पूजेच्या उत्सवात ८३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगेत स्नान करताना घडलेल्या अपघातांमुळे आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले आहे.
83 people died during Chhath Puja in Bihar
Rescue teams at Ganga Ghat in Bihar after 83 people died during Chhath Puja rituals.
Published On

83 people died during Chhath Puja in Bihar : बिहारमध्ये छठ पूजेच्या उत्सवावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. राज्यात ४८ तासात झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला अन् तरूणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. छठ महापर्वाच्या पूजेच्या बिहारमध्ये आनंदाचे वातावरण होते, देशभरात गेलेले बिहारी आपल्या घरी परतले. घरात आनंद, उत्सवाचे वातावरण होते. पण याच आनंदावर विरजण पडले. पूजेच्या वेळी पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे राज्यात ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. पटनामध्ये ९ जणांनी जीव गमावलाय तर दक्षिण बिहार ३४, कोसी सिमांचल, पूर्वबिहारमध्ये ३० आणि उत्तर बिहारमध्ये १९ जणांचा मृत्यू झालाय.

पटना जिल्ह्यात गंगा स्नान करताना वेगवेगळ्या ठिकाणी १५ जण बुडाले, त्यामधील ९ जणांचा मृत्यू झालाय. मोकामामध्ये ३, बिहटा आणि खगौलमध्ये प्रत्येकी दोन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर मनेरमध्ये पाण्यात बुडून दोन आणि अथमलगोलामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. बचावपथकाकडून अनेकांना वाचवण्यात आले. पण काही जण खोल पाण्यात गेल्यामुळे तात्काळ मदत मिळू शकली नाही अन् त्यांचा मृत्यू झाला.

83 people died during Chhath Puja in Bihar
Bacchu Kadu : नाही तर सर्व रस्ते जॅम करु...बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम

वैशाली जिल्ह्यातील राघोपूर आणि महुआ येथे छठ घाट बांधल्यानंतर आंघोळ करताना दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला. तर महनारमध्ये एक, गोपाळगंज जिल्ह्यातील भोरे पोलिस ठाण्यातील दुबे जिग्ना गावात दोन, औरंगाबादमध्ये दोन, भोजपूरमध्ये एक, बेगुसरायमध्ये एक, नवानगरमध्ये एक, रोहतासमध्ये एकाचा मृत्यू झाला. छप्रा येथेही बुडून एकाचा मृत्यू झाला.

83 people died during Chhath Puja in Bihar
Maharashtra politics : भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात डाव टाकला, अजित पवारांनंतर शिंदेंना दिला धक्का, २ महत्त्वाचे नेते गळाला

भावाचा बुडून मृत्यू, बहिणीनेही प्राण सोडले -

मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पाटण्याजवळील मोकामामध्ये दुर्दैवी घटना घडली. मरांची येथील बडपूर घाटावर गंगेत स्नान करताना रॉकी पासवान या २१ वर्षाच्या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच बहीण सपना हिचाही धक्का बसून मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.

83 people died during Chhath Puja in Bihar
Nagpur : शेतकऱ्यांनो टोकाचं पाऊल उचलू नका, 2-4 मंत्र्यांना कापा, तुपकर आक्रमक

बडपूरमधील पासवान यांचा मुलगा रॉकी गंगेत आंघोळ करत होता. तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. खूप प्रयत्नांनंतर त्याला वाचवण्यात यश आले नाही. एसडीआरएफ पथकाने रॉकी पासवानचा मृतदेह बाहेर काढला. सपना कुमारीला या घटनेची माहिती मिळाली आणि तिची प्रकृती बिघडली. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे तिचा मृत्यू झाला.

83 people died during Chhath Puja in Bihar
Nashik Accident: साई भक्तांवर काळाचा घाला, शिर्डीला जाताना कारचा चक्काचूर, ३ भाविकांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com