Nashik Accident: साई भक्तांवर काळाचा घाला, शिर्डीला जाताना कारचा चक्काचूर, ३ भाविकांचा जागीच मृत्यू

Nashik Yeola road accident involving Shirdi pilgrims : साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीकडे निघालेल्या सात भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. नाशिकच्या येवला तालुक्यात कारचा चक्काचूर होऊन तिघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी.
Nashik Yeola road accident involving Shirdi pilgrims
Nashik Yeola road accident involving Shirdi pilgrimsSaam TV Marathi News
Published On

Sai devotees killed in tragic car crash on way to Shirdi : शिर्डीला साई बाबांचे दर्शन घ्यायला निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला आहे. नाशिकमधील येवल्यात अलिशान गाडीचा भयंकर अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तात्काळ मदतकार्य केले. जखमींना त्यांनी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. त्यामधील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. (Latest Shirdi accident update: pilgrims dead and injured)

मिळालेल्या माहितीनुसार, साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी सूरतहून (Gujarat family’s Shirdi trip ends in fatal crash) ७ जण फॉर्च्युनर गाडीने निघाले होते. त्यावेळी नाशिकमधील येवला तालुक्यातील एरंडगावमध्ये चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन् होत्याचे नव्हते झाले. एका क्षणात कारचा चक्काचूर झाला. तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत बचावकार्य केले. पोलिसांकडून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याशिवाय मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.

Nashik Yeola road accident involving Shirdi pilgrims
Maharashtra politics : भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात डाव टाकला, अजित पवारांनंतर शिंदेंना दिला धक्का, २ महत्त्वाचे नेते गळाला

गुजरातमधील सुरतवरून शिर्डीकडे साई बाबांच्या दर्शनाला येत असताना नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगावात रायते शिवारात अपघात झाला. चालकाचे फॉर्च्युनर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दोन-तीन पलट्या मारल्या. या अपघातात गाडीतील दोन जण जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व पाच जखमींना नाशिक‌ येथे उपचारासाठी नेत होत. त्यावेळी एक जण रस्त्यात मृत पावला तर बाकीच्या चौघांवर नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. पोलिसांकडून या अपघाताचा तपास केला जात आहे.

Nashik Yeola road accident involving Shirdi pilgrims
Plane Crash : विमान थेट शाळेवर कोसळलं, १२ जणांचा मृत्यू, केनिया दु:खात बुडाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com