Plane Crash : विमान थेट शाळेवर कोसळलं, १२ जणांचा मृत्यू, केनिया दु:खात बुडाले

Kenya Plane Crash Update : केनियात शाळेवर विमान कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. बचावकार्य सुरू असून तपासाला वेग आला आहे.
Kenya plane crash
Rescue teams at the crash site after a passenger plane crashed into a school in Kenya’s Kwale County, killing 12 people.Saam TV Marathi News
Published On

Kenya plane crash latest update from Kwale County : केनियामध्ये विमान शाळेवर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, डियानी येथून विमानाने सकाळी उड्डाण घेतले होते. ते किचवा टेम्बोकडे जात होते. त्याचवेळी केनियातील क्वाले येथील शाळेवर कोसळलं. केन्या सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटीने या घटनेला दुजोरा दिला आहे. विमानामुळे काही घरांचेही नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. या भयानक अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींची संख्या पाहाता मृताचा आकडा वाढू शकतो, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले.

केनियातील स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी क्वाले काऊंटीच्या त्सिम्बा गोलिनी परिसरात विमान क्रॅश झाले. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान पर्यटकांना घेऊन डियानीवरून किचवा टेम्बोकडे निघाले होते. स्थानिक वेळेनुसार, सकाळी साडे आठ वाजता हा अपघात झाला.

Kenya plane crash
Cyclone Alert: महाराष्ट्रावर 'मोंथा' चक्रीवादळाचं संकट, पुण्यासह राज्यात धो धो कोसळणार,IMD चा मुसळधार पावसाचा अंदाज

न्यूज पोर्टल ‘Kenyanews’ला केन्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीने (KCAA) याबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, रजिस्ट्रेशन नंबर 5Y-CCA नंबर असणारे विमान डियानीवरून किचवा टेम्बोकडे निघाले होते. ते 0530Z वर क्रॅश झाले.

Kenya plane crash
Phaltan Doctor Case: पुरावे नष्ट करून सरेंडर, SIT मार्फत चौकशी करा, फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गावकरी रस्त्यावर

विमान अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळावर धाव घेतली. बचाव पथकाने तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू केले आहेत. काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

Kenya plane crash
Phaltan News : फटलण डॉक्टर अत्याचार प्रकरणातील आरोपी PSI बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल

विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामध्ये दुर्घटनाग्रस्त विमान दिसतेय. आगीच्या ज्वाळा अन् लोकांची गर्दी या व्हिडिओत दिसत आहे. विमानाचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला? याबाबतचा तपास करण्यात येत आहे. अद्याप कोणतेही कारण समोर आलेले नाही. खराब हवामान हे एक कारण असू शकते, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

Kenya plane crash
साताऱ्यानंतर नागपूरमध्ये खाकीवर डाग, पोलिसाने बलात्कार केल्याचा २३ वर्षाच्या मुलीचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com