Phaltan News : फटलण डॉक्टर अत्याचार प्रकरणातील आरोपी PSI बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल

Phaltan Viral Video News : फलटण डॉक्टर अत्याचार प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्रभर या घटनेने संतापाची लाट उसळली असून पोलिसांवर टीकेचा वर्षाव होतोय.
PSI Gopal Badane’s Video Viral
PSI Gopal Badane’s Video Viral
Published On

ओंकार कदम, सातारा प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

PSI Gopal Badane’s Video Viral : साताऱ्यातील फलटणमधील महिला डॉक्टर बलात्कार अन् आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये महिला डॉक्टराने आत्महत्या करण्याआधी पीएसआय गोपाळ बदने आणि घरमालक प्रशांत बनकर यांची नावे लिहिली होती. रक्षकच भक्षक झाल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. याच प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन असलेल्या पीएसआय गोपाळ बदने याचा जुना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावर विनाकारण गाड्या अडवून चौकशी करत असल्याचे या व्हिडिओत दिसतेय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा फलटण पोलिसांवर लोकांकडून टीकेची झोड उडत आहे. (PSI Gopal Badane old video viral on social media)

फलटण महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदने याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वर्दीवर नलतानाही पीएसआय बदने हा रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. एका वाहनचालकाने त्यावेळी त्याचा मोबाईल काढून या घटनेचं चित्रीकरण केलं आणि तोच व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

PSI Gopal Badane’s Video Viral
Cyclone Alert: महाराष्ट्रावर 'मोंथा' चक्रीवादळाचं संकट, पुण्यासह राज्यात धो धो कोसळणार,IMD चा मुसळधार पावसाचा अंदाज

दरम्यान, बदने सध्या फलटण पोलिस ठाण्यातील बलात्कार प्रकरणात संशयित असून तो पोलिस कोठडीत आहे.चालकाची विनाकारण विचारपूस करत असलेल्या बदने याचा हा व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. पण फलटण आणि साताऱ्यात हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. बदने याच्या या व्हिडिओमुळे पोलिसांवर टीकेची झोड उडाली आहे. सर्वसामान्यांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येतोय. कायद्याचे रक्षकच असे करत असतील, तर सर्वसामान्यांनी काय करावे? असा सूर नेटकऱ्यांचा आहे.

PSI Gopal Badane’s Video Viral
Phaltan Doctor Case: पुरावे नष्ट करून सरेंडर, SIT मार्फत चौकशी करा, फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गावकरी रस्त्यावर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com