Bacchu Kadu Farmers Protest latest news : शेतकरी नेते बच्चू कडू यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य हमीभाव यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी सरकारला पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी 'सातबारा कोरा झाल्याशिवाय आता माघार नाही,' असा थेट इशारा सरकारला दिला आहे. सरकारने दुपारी बारापर्यंत मागण्या ऐकल्या नाहीत, तर राज्यभरातील रस्ते अडवून 'चक्काजाम' करण्याचा आणि रेल्वे ट्रॅकवर बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, उसाला प्रतिक्विंटल ४३०० रुपये एफआरपी आणि कांद्यावरील निर्यात शुल्क कायमचे रद्द करणे यांसारख्या मागण्यांचाही यात समावेश आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. (Bacchu Kadu threatens Maharashtra government over farmers’ demands)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.